गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
लोणी भापकर पवार वस्ती येथे कत्तलीसाठी चालवलेली बेचाळीस जनावरे पकडली.

0
1
4
5
6
9
वडगांव निंबाळकर:दिनांक ०३/१०/२०२४ रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास लोणी भापकर,पवार वस्ती तालुका बारामती येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी घेऊन जाणारी जनावरे डांबून ठेवण्यात आली आहेत अशी माहिती फिर्यादी दीपक नंदकुमार शिरतोडे रा.कोऱ्हाळे बुद्रुक तालुका बारामती यांना मिळालेली होती.
त्या माहितीच्या आधारे शिरतोडे यांनी ११२ नंबर वर ही माहिती दिली व स्वतः मिळालेल्या माहिती नुसार त्या ठिकाणी पोहचले असता दोस्त कंपनीच्या टेम्पोमध्ये तसेच इनोवा कार मध्ये आणि उभ्या असलेल्या आयशर कंपनीच्या टेम्पोमध्ये सर्व जनावरे भरून दोस्त कंपनीचा टेम्पो व इनोव्हा कार पुढे निघाली होती, आयशर कंपनीच्या टेम्पो चालकास जागेवर थांबवून सोबत एक सहकारी थांबवून इतर दोन वाहनांचा पाठलाग केला. दोस्त कंपनीचा टेम्पो एम एच ०९ सी यु ६५४२ हा गाडी थांबून अंधाराचा फायदा घेत पळून गेला
तसेच इनोवा कार एम एच ११ बी एच ९०७४ मधील चालकाने गाडीतील जनावरे रस्त्यावर उतरून गाडी लॉक करून अंधाराचा फायदा घेत पळून गेला.
काही वेळात पोलिसही पोहोचले व पोलिसांनी आयशर टेम्पो नंबर एम एच ०९ सी यु ६४४१
चालकाकडून माहिती घेतली असता तीनही वाहनांमध्ये जर्सी गाई व लहान नर वासरे बेकायदेशीर रित्या वाहतुकीस परवानगी नसताना व जनावरांची चारापाण्याची कोणतीही सोय न करता त्यांचे दोरीने पाय बांधून क्रूरपणे कत्तली करिता घेऊन जात असल्याचे लक्षात आले.

अधिक ची माहिती घेतली असता वाहनांमध्ये
आठ काळे पांढरे रंगाच्या जर्सी जातीची गाई अंदाजे वय ६ ते ७ वर्ष, तसेच काळे पांढरे रंगाची जर्सी जातीची ३२ नर वासरे वय अंदाजे १५ दिवस ते ३० दिवस वयाची त्यांचे तोंडास काळी घट चिकटपट्टी लावलेली व चारी पाय घट्ट बांधलेले सोबत दोन मयत नर वासरे वय अंदाजे १५ दिवस ते ३० अशी एकूण ४२ जनावरे आढळून आली.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व गोष्टी ताब्यात घेतल्या व यशवंत गोशाळा राजळे येथे सुपूर्द करण्यात आले.

पोलिसांनी अधिक तपास करीत रात्री उशिरा गुन्ह्याची नोंद केली यामध्ये १) तजू आशिफ कुरेशी रा.बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे २)जयपाल आप्पासो शिंदे रा. पारवडी तालुका बारामती जिल्हा पुणे
३)अतिफ रशीद मुलानी रा. भिगवण तालुका बारामती जिल्हा पुणे
एक दोस्त टेम्पो नंबर एम एच ०९ सी यु ६५४२ नाव पत्ता माहित नाही
एक टोयोटा कंपनीची इनोवा कार नंबर एम एच ११ बी एच ९०७४ चालक नाव पत्ता माहित नाही यांचेवर प्राण्यांचा छळ अधिनियम 1960 (१) (a) (d)(e)(h)(f) महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुरक्षा अधिनियम १९९५ ९ ,५ अ,ब भारतीय न्याय संहिता ३२५ ,३(५) मोटर वाहन अधिनियम ८३ नुसार कारवाई करत रात्री उशिरा गुन्हा नोंद केला. सदरचा गुन्हा रजिस्टरी दाखल केला असुन गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो.कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना करण्याची तजवीज ठेवलेली आहे .पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे हे करीत आहेत.