वडगाव निंबाळकर: येथील सुनिल सुबंध,मोहम्मद शेख,रामचंद्र भंडलकर सर,आशक आत्तार सर,जयराम पवार सर, विजय गवळी सर ,बबन बारवकर.या मित्रांनी एकत्र येत दिनांक २४/१०/२०२४ रोजी मुर्टी-मोढवे येथील यशवंतराव मोरे पाटील या आश्रम शाळेस भेट दिली व त्या शाळेतील इ.१ ली ते इ.५ वी पर्यंतच्या लहान अनाथ मुलांना मोफत रेडीमेड कपडे वाटप केले.

येणारा सण प्रकाशाचा सण,आनंदाचा सण आहे. इतरांसारखे आम्हालाही नवीन कपडे मिळाले हा क्षण तेथील अनाथ मुलांचा आनंद व्दिगुणित करणारा होता.
नवीन कपडे मिळाल्याने मुलेही खूप असल्याचे पाहायला मिळाले.

उल्लेखनीय बाब अशी की श्री. रामचंद्र भंडलकर सर यांनी तेथील ५ अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी स्वीकारली आहे.
सुनिल सुबंध यांच्या संकल्पनेतून घडून आलेला हा क्षण सर्वच मित्रांना एक विलक्षण आनंद देणार होता.

“मी समाजाचे काहीतरी देणे लागतो व ती माझी नैतिक जबाबदारी आहे या जाणिवेतून समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना काहीतरी मदत व्हावी ही भावना मनात ठेवून येणाऱ्या दिवाळी सणाला मदत करावी असे आम्ही मित्रांनी ठरवले, आम्हीही गरिबीच्या झळा सोसलेल्या आहेत, एक वेळ अशी होती की आमच्या पायाला चप्पल आणि अंगाला कपडा नव्हता हि सल मनात आजही आहे, आज आमची परिस्थिती बदलली आहे पण ती सल मनात आजही आहे किंवा राहील आपण पाहिलेले दिवस इतर कोणाच्या वाट्याला नसावेत म्हणून आम्ही एक निर्णय घेतला असे श्री.सुनिल ऊर्फ राजू सुबंध यांनी सांगितले.
जे कार्य केले त्यात मानसिक व आत्मिक समाधान लाभले आहे एवढीच भावना सर्वांनी व्यक्त केली.



बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा