अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
बारामती तालुका नाभिक महामंडळाची कार्यकारणी जाहिर-श्री.धिरण रविंद्र पवार,वडगांव निंबाळकर यांची बारामती तालुका अध्यक्षपदी निवड

0
1
4
5
6
9
बारामती : महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ पुणे जिल्हा तसेच बारामती तालुका नाभिक संघटना यांच्या वतीने
शनिवार दिनांक १५-०३-२०२५ रोजी श्री.संत शिरोमणी सावतामाळी सभागृह,वडगाव निंबाळकर तालुका बारामती जिल्हा पुणे येथे कार्यकारिणी निवडीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीसाठी प्रमुख पाहुणे म्हणुन नाभिक महामंडळाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष,श्री रमेशजी राऊत तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष, श्री.अशोकरावजी मगर, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ. मंगलाताई आढाव, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र नाभिक महामंडळ श्री.शंकरराव तात्या मर्दाने हे होते.
दरम्यान वडगांव निंबाळकर येथील श्री.धिरण रविंद्र पवार यांची बारामती तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
तर उर्वरित कार्यकारणी मध्ये श्री.सतिश छबन कर्वे यांची कार्याध्यक्ष आणि श्री.महेश छबन जाधव यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
तसेच श्री.राहुल शिवाजी जाधव यांची सचिव पदी निवड करण्यात आली, त्याचबरोबर सौ.राजश्री सुहास जगताप यांची बारामती तालुका महिला अध्यक्षपदी आणि सौ.पुष्पा मनोज जाधव यांची बारामती तालुका उपाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.