
बारामती : समाज कितीही पुढारला तरी लग्न व लग्नातील मानपान, लग्नात भेट स्वरूप दिल्या जाणाऱ्या गोष्टी किंवा न दिल्या गेलेल्या गोष्टी किंवा मुलं होत नाही म्हणून तर कधी मुलीच्या माहेरकडुन ऐनवेळी काहीतरी मागणी करून लग्न झालेल्या मुलींचा छळ होतो अशा गोष्टी आपण आतापर्यंत तरी ऐकत आलो आहोत.

अशाच काही कारणांसाठी आरती निलेश लोणकर वय २९ वर्षे रा.जामदार रोड बारामती ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स आहेत,त्यांचे लग्न सप्टेंबर २०२० मध्ये झाले तेंव्हा पासून २४ जानेवरी २०२५ पर्यंत तु आमच्या घरी आल्यापासुन आम्ही कर्जबाजारी झालो आहोत,असे म्हणत नेहमी त्यांचा मानसिक व शारिरीक छळ केला गेला आहे व नेहमी वाईट बोलून मारहाण केली जात होती. व आता माहेरहून पैसे आणण्यासाठी प्रचंड दबाव टाकण्यात येत होता, याच कारणाने त्यांचा पती निलेश लोणकर याने भांडणादरम्यान माझा गळा दाबुन व फरशी धुण्यासाठी वापरले जाणारे फिनेल पाजुन मला निर्दयीपणे जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे असे आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

वरील प्रकाराबाबत गांभीर्याने दखल घेत बारामती शहर पोलीसांनी आरोपी पती निलेश मारुती लोणकर, सासु वंदना मारुती लोणकर,सासरे मारूती लोणकर,दिर उमेश मारुती लोणकर ,मंगेश मारुती लोणकर,जाऊ शुभांगी, उमेश लोणकर, सर्व रा.मुक्ताई टाऊनशिप, जामदार रोड कसबा बारामती आणि ननंद उमा नितीन घनवट व नितीन घनवट हे दोघे रा. डोर्लेवाडी ता.बारामती यांच्यावर आरती निलेश लोणकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला आहे.

पुढील अधिकचा तपास बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक, श्री.गजानन चेके करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा