अ.नगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या सन १९९८-९९ बॅचचे इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. जवळपास २५ वर्षांनी सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला. १२० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या वेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त शिक्षक रमेश वारुळे, सूर्यभान गोपाळे, काकड सर, भंडारी सर, झिने सर आदि उपस्थित होते.
सर्व शिक्षक वर्गाचे या माजी विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या काळात या शाळेमध्ये घडलेल्या बऱ्या वाईट अनुभव त्याचप्रमाणे मिळालेले योग्य मार्गदर्शन काही हास्य विनोदात्मक प्रसंग कथन केले.

कार्यक्रमाचे नियोजन राहरी फॅक्टरी येथील पंकज ढुमणे, अविनाश सरोदे, संदीप शेळके, तरुण महेंद्र यांनी केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, डॉ. किशोर वाघमारे यांनी आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. अतुल सगळगीळे व त्याच्या टीमने नृत्य सादर केले. तर योगेश देशमाने यांनी आपल्या खास विनोदी शैलीत मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पागिरे, योगिता पेरणे अजय बोचकरे व प्रवीण औटी यांनी केले.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा