गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
राहूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेमाप अवैध धंदे-आर्थिक देवाण घेवाणीमुळे अवैध धंद्यावर कारवाई होत नाही ?

0
1
4
5
6
9
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी : तालुक्यातील बहुतांशी गावात अतिक्रमण काढल्यानंतर रस्त्याच्याच्या कडेला चालणारे अवैध धंदे मोडीत निघतील अशी अशा विशेषतः महिलांना होती.परंतू, हे चालू असलेले अवैध धंदे उघड्यावर सुरु आहेत , याचे उत्तम उदाहरण देवळाली प्रवरात पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी उघड्या डोळ्याने पाहिले असले तरी कारवाई मात्र काहीच करुच शकले नाही.उलट पोलिसांची गाडी त्या रस्त्यावर आली असता आपण घाबरायचे नाही.आपण काय फुकट धंदा करीत नाही.महिन्याला वेळेवर हप्ता द्यावा लागतो आणि देतो.असे मोठ्या आवाजात अवैध चालकाच्या लिडरने सांगितले.
पोलिस निरीक्षक ठेंगे यांनीही हे बोलणे ऐकल्याने अवैध धंदे चालकांचा “ये पैसा बोलता है” अशी अवस्था झाली आहे,पोलिस निरीक्षकांना अवैध पैशामुळे अवैध धंदेवाल्यांना शहाणपण दाखवता आले नाही अशी लोकांमध्ये चर्चा आहे.
देवळाली प्रवरा नगर पालिकेतील मज्जिद पाडण्या संदर्भातील बैठक अटोपून पोलीस निरीक्षक यांना दुसऱ्या मार्गाने राहुरीला जावे लागले.
यावरून प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने डोळ्याने पाहिली व कानाने ऐकलेली घटना पत्रकारांना सांगितली. त्याने सांगताना पोलिसांपेक्षा अवैध धंदे चालकांचाच जास्त दरारा आहे.असे एकंदरीत वातावरण आहे.
बुधवार दि.५ रोजी सकाळी १०;३० वाजता राहुरी पोलिस निरीक्षक देवळाली प्रवरा नगर पालिकेत राहुरी फँक्टरी येथिल मज्जिद पाडण्या संदर्भातील बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे जेव्हा बाजारतळावरुन पालिकेकडे सरकारी वाहनाने जात असताना बाबुराव पाटील मंदिराजवळ पोलिस गाडी येताच अवैध धंदे चालकातील एक जण मोठ्याने आवाज देवून “ये पळा रे पोलिस गाडी आली.”अवैध धंदे चालकांचा लिडर तेथेच उभा होता.कोणीही पळायचे नाही, आपण काय फुकट धंदा करतोय का?असा प्रश्न त्या लिडरने अवैध धंदे चालकांना केला.त्यावर अवैध धंदे चालकही आपल्या धंद्यावर ठामपणे उभे राहिले. कायद्याचा धाक येथे चालत नाही. कायद्यापेक्षा पैसा मोठा आहे.
हे उघड्या डोळ्याने पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी पाहिले.ठेंगे यांचा धाक मात्र कालच्या घटनेतून दिसत नाही, हे लक्षात येत आहे. हद्दीतील अवैध धंदे चालकांकडून होणाऱ्या दिवाण-घेवाणूतून असे घडत असावे अशी नागरिकांना वाटत आहे, व एकंदरीतच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निरीक्षकांचा आपल्या हद्दीतील धाक संपल्यासारखा वाटत आहे.
पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी उघड्या डोळ्याने पाहुनही डोळे झाकुन पालिकेत पोहचावे लागले.अवैध धंदे चालकांकडून दरमहा मिळणाऱ्या पुडक्यामुळे पोलिसांनाही दिसत असतानाही आंधाळे व्हावे लागते हि पोलीस प्रशासनासाठी जर्मनीय गोष्ट आहे.
देवळाली प्रवरा नगर पालिकेत मुख्याधिकारी विकास नवाळे व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह राहुरी फँक्टरी येथिल मुस्लिम समाजाचे आठ दहा जणांची एकत्रित बैठक झाली.राहुरी फँक्टरी येथील मज्जिद पाडायची की ठेवायची याव तीन तास चर्चा करण्यात आली.पालिकेत झालेल्या बैठकीतील चर्चा मात्र समजू शकली नाही.बैठकी नंतर पोलिस निरीक्षक ठेंगे राहुरीला जाताना अवैध धंदे असणाऱ्या रस्त्याने न जाता दुसऱ्या मार्गाने गेले.यावरुन त्या मार्गाने जाताना पुन्हा डोळे झाकण्याची वेळ नको म्हणून त्यांनी पर्यायी मार्ग निवडला असावा असे स्थानिक नागरिकांना वाटत आहे.
एकंदर राहूरी पोलिसांचा धाक तालुक्यात कमी झाला आहे व अवैध धंदे चालक राजरोजपणे धंदा करीत आहेत. कारण दर महिन्याला पैसे मोजतोय असे जाहिरपणे अवैध धंदे चालकांचे लिडर सांगत आहेत. कायद्यापेक्षा पैसा मोठा आहे हे उघड झाले आहे.
उघड्या डोळ्यांनी पाहून सुद्धा राहुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ठेंगे यांनी अवैध धंदे चालक,अवैध व्यवसाय उघड्यावर करीत असल्याचे पाहिले.मात्र कारवाई काहीही नाही यामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश गेला तो म्हणजे पोलिस निरीक्षक ठेंगे यांचा धाक संपला आहे.
जर राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत चुकीच्या पद्धतीने अवैध धंद्यांना लाचखोरीमुळे पाठबळ मिळत असेल तर अशा अधिकाऱ्याची बदली करण्यात यावी अशीही स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा होताना पाहिला मिळत आहे.
“आता अवैध धंद्यांवर कारवाई होणार? कि पोलीस निरीक्षकांवर होणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे”