बारामती : जाणता राजा युवा प्रतिष्ठान तर्फे वडगाव निंबाळकर मध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते, यावेळी गावातील सुमारे ४५ मंडळानी एकत्र येत आपली सामाजिक बांधिलकी जपली.
“रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” असे मानून ग्रामीण भागातील रक्तदानासाठी विशेष प्रयत्न करून रक्तदानाची विक्रमी नोंद केली,
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील छत्रपती जाणता राजा युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने दरवर्षी सामाजिक बांधिलकी जोपासत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते,यावर्षीही प्रतिष्ठानच्या वतीने एकोणीसावे वर्ष पूर्ण करत प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमामधून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
या वर्षीही शिवजयंती निमित्त रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करुन गावातील सुमारे ४५ मंडळांना एक विचाराने एकत्रित करत रक्तदान शिबिराचे आयोजन केले, या शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,वडगाव निंबाळकर या ठिकाणी करण्यात आले होते. रक्तदान शिबिरामध्ये एकूण २०५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपले बहुमूल्य असे रक्त दान केले.
या शिबिरामध्ये वडगाव निंबाळकर मधील सर्व तरुण मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील तरुण व इतर ग्रामस्थ मंडळी, व डॉक्टर, आशा सेविका, महिला यांनी यामध्ये सहभाग दाखवला व रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले.
या शिबिरासाठी श्री. छत्रपती जाणता राजा युवा प्रतिष्ठान वडगाव निंबाळकर चे अध्यक्ष, जितेंद्र पवार यांनी केलेल्या अवाहानाला प्रतिसाद देत गावातील प्रमुख मंडळांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते यामध्येअमित निंबाळकर, संतोष भोसले, अनिकेत अचपळ, सुनिल जाधव, अभिजीत दरेकर, तुषार राजेनिंबाळकर, तानाजी जाधव, विपुल जाधव, संदिप आगम, सुरेश निकम, प्रमोद किर्वे, समीर खोपडे, आकाश बालगुडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले.
छत्रपती जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने केलेल्या आव्हानाला गावातील बहुतेक मंडळांनी प्रतिसाद दिला व कार्यक्रमाची शोभा वाढवून आपले कर्तव्य पार पाडले याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, तसेच या शिबिरासाठी मेहनत घेणारे डॉक्टर,नर्स,स्वयंसेवक,तसेच गावातील नागरिकांचाही मी मनस्वी आभारी आहे.
श्री.जितेंद्र पवार,अध्यक्ष,छत्रपती जाणता राजा प्रतिष्ठान वडगाव निंबाळकर
“रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे व ते प्रत्येकाने करायलाच हवे” असेही आव्हान प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जितेंद्र पवार यांनी केले.