
अहिल्यानगर, जिल्हा प्रतिनिधी
राहुरी : हिंदूवर ताबा मिळवायचा प्रयत्न करीत असाल तर…”आम्ही गांधीला नाही तर नथुराम गोडसेला मानणारे कार्यकर्ते आहोत”.जो धर्मा सोबत उभा राहिल त्या सोबत आम्ही उभे राहणारे आहोत. राहुरी फँक्टरी येथील आंबिकानगर येथील अनाधिकृत मज्जिद पाडण्यासाठी महसुल प्रशासनास आठ दिवसाची मुदत देण्यात आली असुन आठ दिवसाच्या आत मज्जिद न काढल्यास आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लावू नका,सकल हिंदू समाजाच्या वतीने हि मज्जिद काढण्यात येईल असा इशारा सकल हिंदु समाजाच्या वतीने आ.संग्राम जगताप व सागर बेग यांनी दिला आहे.
आ.संग्राम जगताप व सागर बेग यांच्या हस्ते श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांना पुप्षहार अर्पण करुन रँलीद्वारे आंबिकानगर येथिल मज्जिद शेजारील प्रांगणात पोहचले.आंबिकानगर येथिल महादेव मंदिरात आ.जगताप व बेग यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

यावेळी आ.संग्राम जगताप यांनी आपल्या भाषणातून सांगितले की,हिंदू समाजात संस्कृती शिकविण्याचे काम वडील धारी करतात.हा या समाजाला शिकविण्यासाठी बाहेरची माणसे लागतात. धर्माची शिकवण आईच देते.यापूढे अनाधिकृत मज्जिद उभारुन देणार नाही.कुठे अशा मज्जिद उभारत असतील तर त्याची माहिती आधी प्रशासनाला द्या. प्रशानाने कारवाई केली नाही तर आम्ही आणि तुम्ही हातोडा घालायला आहेच.
आठ दिवसात आंबिकानगर येथील मज्जिद काढली नाही तर विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला जाईल.ईद सुरु आहे आता फळे खायला जाणारांनी विचार केला पाहिजे.संभाजी महाराजांनी समाजासाठी आपल्या विचारांची तडजोड केली नाही.या धर्मातील काहींची थडगेही महाराष्ट्रात ठेवायचे नाही.अशा ठिकाणी आपण जावून रेकी करा कुठुन प्रवेश करायचा कुठून बाहेर पडायचे याची माहिती असणे आवश्यक आहे.आ.जगताप यांनी प्रशासनावर सडकून टिका केली.प्रशासनाने आठ दिवसात मज्जिद हटविली नाही.तर सकल हिंदू समाज त्यावेळी जो निर्णय घेतील तो निर्णय प्रशासला मान्य करावा लागेल.ईदच्या काळात ज्या नेत्यांना इफ्तार पार्टीला जावून फळ खायचे आहे.त्यांची सोय राज्य सरकार मार्फत केली जाईल.असे आ.जगताप यांनी सांगितले.

श्रीम संघाचे सागर बेग म्हणाले की, विधानसभा निवडणूकीत प्रचारा दरम्यान येथिल महिलांनी या मज्जिदीचा प्रश्न मांडला होता.त्यावेळी मी या महिलांना आश्वासन दिले होते. ते आश्वासन पुर्ण करण्याचीवेळ आली आहे.येथील तरुणांनी तक्रारी दिल्या होत्या पण त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी याच तरुणांवर कारवाई करण्याची धमकी दिली होती.आज फक्त येथील जनता उपस्थित आहे.उद्या जिल्ह्यातील लोक येतील. त्यामुळे प्रशासनाने तातडीने मज्जिद अतिक्रमण काढुन घ्यावे. बाहेरील राज्यातील लोक आपल्या महाराष्ट्रात राहतात याची माहिती प्रशासनाला नसते.संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी आपले बलिदान दिले.धर्मासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे,असे बेग यांनी सांगितले.
प्रशासनाच्या वतीने देवळाली प्रवरा नगर पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी निवेदन स्वीकारले.

यावेळी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी नगरसेवक,या सभेचे नियोजन ज्ञानेश्वर मोरे,प्रशांत काळे,अजय नागरे,संतोष हारदे,विकास साळुंखे,गजानन गाडे,विठ्ठल बर्डे,सोमनाथ देसाई,प्रविण बारवकर,एकनाथ आढाव,रामभाऊ वरखडे आदींनी केले होते.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा