गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
सुप्रसिद्ध गायकावर बारामती शहर पोलिसात गुन्हा दाखल
शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने पत्नीनेच केली तक्रार

0
1
4
5
6
9
बारामती : आमदार झाल्यासारखं वाटतयं या सुप्रसिद्ध गाण्याचे गायक संकल्प गोळे यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी त्यांच्याच पत्नीने त्यांच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे.
गोळे यांचा मागील वर्षीच ५ फेब्रुवारी २०२३ रोजी विवाह झाला आहे मात्र लग्नानंतर एक महिन्यातच पत्नीला तिचे स्वतःचे उपजीविकेचे मुख्य साधन असलेल्या औषधाचे दुकान बंद करण्यास आणि घटस्फोट देण्यास दबाव आणत, गोळे हे नेहमी दारु पिऊन संशय घेवून तु व्यवस्थितीत काम करत नाही, तु कोणाबरोबरही चॅटींग करते, कोणाबरोबरही फोनवर बोलते, तुला घरकाम येत नाही, तु तुझे बारामती येथील मेडीकल दुकान बंद करून पुणे येथे चालु कर नाहीतर मी तुला नांदवणार नाही, तु मला घटस्पोट दे,मला दहा बायका भेटतील, मला तुला नांदवायचे नाही, असे म्हणून रोज हाताने मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी करीत असे तसेच सासु तु मला माघारी बोलते,आम्हाला तुला नांदवायचे नाही, माझी मुलगी समिक्षा हिच्या लग्नासाठी तु माहेराहून दहा तोळे सोन्याचे दागिने घेवुन ये,असे म्हणुन मानसीक छळ करीत असत तसेच माझे सासरे हे सुद्धा दारु पिवुन मला शिवीगाळ करतात तसेच सासु व सासरे यांनी पुणे येथे मेडीकल शॉप चालविण्यासाठी माहेरहून १० लाख रु घेवुन ये असे म्हणत व शिवीगाळ दमदाटी करत होते. माझी नणंद समिक्षा मला उपाशीपोटी ठेवून शारीरीक मानसिक जाच करत व शिवीगाळ करून दमदाटी करत असतात या कारणावरून गोळे यांच्या पत्नीने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी गायक गोळे यांच्या सह त्यांच्या घरातील इतर चार सदस्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गायक गोळे यांनी अनेक प्रसिद्ध गाणी गायली आहेत,व संगीत क्षेत्रात चांगली ओळख निर्माण केली आहे,
त्यांचे आमदार झाल्यासारखं वाटतयं हे गाणं खुप लोकप्रिय आहे व त्याच बरोबर त्यांनी अनेक लोकगीते गायली आहेत.
बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा सौ.पवार या पुढील तपास करीत आहेत.