
बारामती: माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील क-हावागज ता.बारामती गावच्या हद्दीतील हॉटेल शारदा एक्झिक्युटिव्ह बार, रेस्टॉरंट अँड लॉजींग हे दि.१३/०१/२०२५ रोजी रात्री दहा वाजता बंद करून बारचे मॅनेजर तसेच इतर सर्व कामगार हे काम आवरून रात्री अकरा वाजनेचे सुमारास झोपण्यासाठी गेले असता मध्य रात्री पावणे दोन च्या सुमारास विशाल बाबा मोरे, संदेश उर्फ आबा अनिल शिंदे रा. कऱ्हावागज ता.बारामती आणि निखिल अशोक खरात रा.आमराई बारामती यांनी तक्रारदार व हॉटेल मॅनेजर ऋषिकेश भाऊसाहेब मिंड मूळ रा.कडा ता.आष्टी जि.बीड सध्या रा.हॉटेल शारदा बार अँड लॉजिंग कऱ्हावागज हे हॉटेल शारदा मध्ये झोपलेल्या खोलीमध्ये घुसून शिवीगाळ करीत मला दारू देत नाहीस का? आमच्याच गावात हॉटेल चालवतो व आम्हालाच नडतो काय? आता तुला सोडत नाही आता आम्हाला नड असे बोलून मारहाण करून फिर्यादीस खाली पाडले तसेच त्यानंतर निखिल खरात याने त्याच्या जवळील असलेल्या धारदार चाकूने फिर्यादीवर हल्ला केला. फिर्यादी हे वार चुकवण्यासाठी पटकन मागे सरकले त्या मुळे तो वार फिर्यादीच्या पायावर लागला त्यामुळे हॉटेलमधील कामगार फिर्यादीस वाचविण्याकरिता मधे आल्याने हल्लेखोर निखिल खरात याने दिनेश वर्मा मूळ रा.उत्तर प्रदेश याचे पोटात धारदार चाकू खुपसला तसेच इतर कामगारांवर देखील चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला,
त्यानंतर वर नमूद इसम हे त्यांच्या ताब्यातील चार चाकी वाहनातून पळून गेले.

सदरच्या घटनेबाबत माळेगाव पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाल्यानंतर व गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माळेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो. नि.श्री सचिन लोखंडे यांनी माळेगाव ठाणे कडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री देवीदास साळवे यांचे पथक हल्लेखोरांना ताब्यात घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना देऊन तात्काळ रवाना केले,
त्यानंतर विशाल बाबा मोरे ,संदेश उर्फ आबा अनिल शिंदे दोघेही रा. कऱ्हावागज ता.बारामती आणि निखिल अशोक खरात रा.आमराई बारामती असे फरार होण्याचे उद्देशाने पळून जात असताना त्यांना पोलीस उपनिरीक्षक श्री देविदास साळवे यांचे पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषण आधारे हल्लेखोरांना पाठलाग करून दिनांक १४/०१/२०२५ रोजी पहाटे हडपसर गाडीतळ पुणे येथून ताब्यात घेतले आहे.

सदर घटनेच्या अनुषंगाने फिर्यादी जबाब वरून माळेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेनंतर वरील नमूद तिन्ही हल्लेखोर यांना सदर गुन्ह्याचे कामी अटक करण्यात आलेली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. देविदास साळवे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.श्री पंकज देशमुख सो. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा.श्री गणेश बिरादार सो, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, मा.डॉ.श्री सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग, मा.श्री.अविनाश शिळीमकर सो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो.नि. श्री.सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक श्री.अमोल खटावकर, श्री.देविदास साळवे, पोलीस अंमलदार श्री.राहुल पांढरे, श्री.विजय वाघमोडे, श्री.ज्ञानेश्वर मोरे, श्री.नंदकुमार गव्हाणे, श्री. अमोल राऊत, श्री सागर पवार, श्री.जयसिंग कचरे, श्री.अमोल कोकरे यांनी केलेली आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा