बारामती : बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाची वार्षिक बैठक दिनांक १७/१२/२०२४ रोजी होळ-आठ फाटा येथे गणेश रेसिडेंशी येथे पार पडली.
बैठकी दरम्यान मागील सभेचे इतिवृत्त सचिव चिंतामणी क्षिरसागर यांनी वाचून दाखवले.

बैठकीत प्रामुख्याने संघात नवीन सदस्य करून घेणे,पत्रकारांसाठी कल्याणनिधीची तरतूद करणे.पत्रकार संघासाठी पत्रकार भवनाची उभारणी करणे याबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार व संघाचे मार्गदर्शक जयराम सुपेकर (आप्पा) होते.

अध्यक्षपद निवडी दरम्यान सोमनाथ भिले, राजेश वाघ, सुनील जाधव यांनी अध्यक्षपदाची मागणी केली होती, बैठकीत या मागणीवर सविस्तर चर्चा करून सर्वांच्या मंथनातून सर्वानूमते कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारिणी खालील प्रमाणे…
अध्यक्ष- सोमनाथ भिले,
उपाध्यक्ष- राजेश वाघ,
सचिव- चिंतामणी क्षीरसागर
कार्याध्यक्ष- युवराज खोमणे
खजिनदार-सुनिल जाधव
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती अध्यक्ष- महेश जगताप
संघाचे मार्गदर्शक म्हणून जयराम सुपेकर, अशोक वेदपठाक, दत्ता माळशिकरे, ॲड.गणेश आळंदीकर, संतोष शेंडकर यांचीही निवड करण्यात आली.

दरम्यान सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
यांच्या प्रसंगी संघाचे माजी अध्यक्ष मनोहर तावरे, अशोक वेदपाठक, दत्ता माळशिकारे, राजेश वाघ, ॲड. गणेश आळंदीकर, कल्याण पाचांगणे, संतोष शेंडकर, महेश जगताप, राजेश वाघ, विजय मोरे, विजय गोलांडे, विनोद पवार, युवराज खोमणे, दीपक जाधव, हेमंत गडकरी, सचिन पवार, गजानन हगवणे, सोमनाथ लोणकर, संतोष भोसले, सुनील जाधव, सुशीलकुमार अडागळे इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.



बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा