Breaking
अपघातगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

राहुरी पोलिसांची दंबंगगिरी, सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करण्याचा प्रकार, – तडजोड करा नाही तर मार खाण्यास तयार रहा

0 1 4 5 6 9

असा प्रकार घडलाच नाही, अशी सरवासारव राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, संजय ठेंगे यांनी केली आहे.

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी

राहुरी : चोरीच्या गाड्या शोधण्याच्या नावाखाली मोटारसायकल स्वारांची तपासणी करुन विना नंबर व कागदपत्र नसलेल्या मोटारसायकलस्वारां विरोधात वाहतूक पोलिस अधिकाराचा गैरवापर करुन सर्वसामान्य नागरिकांच्या मोटारसायकल आडवून त्यांना मारहाण करण्याचा प्रकार सध्या सुरु असून सर्वसामान्य नागरिक काही बोलला तर त्याची गचंडी धरुन वेळप्रसंगी तोंड लाल करण्यास मागे पुढे पाहत नाही. हा सर्व प्रकार तडजोडीसाठी केला जात असून त्यांच्याच मोटारसायकलवर बसून पोलीस स्टेशन किंवा इतरत्र घेऊन जावून तडजोड केली जाते आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या अतिक्रमण काढण्यासाठी चालू केलेल्या मोहिमेमध्ये पोलीस प्रशासन रात्रंदिवस मेहनत करताना दिसत आहे. परंतु या मोहिमेंतर्गत काही पोलीस कर्मचारी वैयक्तिक स्वार्थ व वर्दीच्या गैरवापर करतानाही दिसत आहे. अशीच घटना राहुरी तालुक्यातील नगर-मनमाड रोडवर असणाऱ्या जिजाऊ चौकात घडली. रविवार दि.२ मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडलेला प्रकार पाहुण नागरिकही आश्चर्यचकित झाले आहे.

राहुरी पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलिस कर्मचारी जिजाऊ चौकात चोरीच्या मोटारसायकल शोध मोहिम राबवित असताना मोटारसायकल स्वारांकडील कागदपत्रांची तपासणी करीत आसताना मोटारसायकलस्वारांवर दबंगगिरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोटारसायकलस्वाराकडे कागदपत्र व वाहन चालविण्याचा परवाना नसल्यास दंड आकारणी केलीच पाहिजे. परंतू पोलिस मात्र आर्थिक तडजोडीसाठी मात्र मोटारसायकलस्वारांची गचांडी धरुन खिशात हात घालण्याचा प्रकारही करीत आहे.

विना नंबर गाडी, विना हेल्मेट चालक, विना कागदपत्रे असणाऱ्या मोटारसायकल आढळल्यास मोटारसायकल चालका विरोधात प्रचलित कायद्यानुसार दंड आकाराने किंवा गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांनी केले पाहिजे ते त्यांचे कर्तव्य आहे. परंतू समाजासमोर वेगळेच दुष्य आले आहे. वाहतुक शाखेत काम करणारे पोलीस कर्मचारी जालिंदर धायगुडे, फुलमाळी, ठोंबरे व इतर पोलीस कर्मचारी है कर्तव्य बजावत असताना कर्तव्या पेक्षा दबंगिरीच जास्त केली जात आहे. मोटारसायकल चालकांना मारहाण करणे असे प्रकार घडू लागले आहेत. मारहाणी नंतर त्याच मोटारचालकाच्या मोटारसायकल चालकास पोलिस ठाण्याकडे नेण्याचा बहाणा करुन इतरत्र घेऊन जावून तडजोड केली जात आहे.

मोटारसायकलस्वारांची पोलिसांनी गचांडी पकडून शिवीगाळ करीत असताना काही सुज्ञ नागरिकांनी हा प्रकार व्हिडीओ रेकॉडींग केला आहे. 

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचा पोलिस कर्मचाऱ्यावर अंकुश राहिला नसुन नुकतेच महानिरीक्षक यांच्या वार्षिक तपासणीला मोठा खर्च आला आसल्याची चर्चा राहुरी पोलिस ठाण्यात सुरु आहे. हा खर्च वसुल करण्याचे आदेश पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी दिले असल्याचे बोलले जात आहे. दोषी कर्मचाऱ्यावर ठेंगे कायदेशीर कार्यवाही करणार की या पोलीस कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणार? अशी चर्चा राहुरी पोलिस ठाण्यात सुरु आहे.

 राहुरीच्या पोलिसांकडे मोठी माया, पवार

राहुरी शहरामधून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होते. या मध्ये राहुरी-मांजरी, राहुरी-वांबोरी, राहुरी श्रीरामपूर, राहुरी-शिर्डी, राहुरी-अहिल्यानगर, राहुरी ताहाराबाद अशी मोठया प्रमाणात राजरोसपने अवैध वाहतूक चालते या अवैध वाहतूक करणाऱ्या ठरावीक लोकांकडून हे पोलीस कर्मचारी जालिंदर धायगुडे, पोलीस हवालदार फुलमाळी, पोलीस हवालदार ठोंबरे हे मोठ्या प्रमाणात माया जमा करीत असल्याचा आरोप बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी केला आहे.

    असा प्रकार घडलाच नाही.

राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याशी संपर्कसाधला असता, असा प्रकार आमच्या पोलिसांकडून होणार नाही. मोटारसायकलस्वारांना मारहाण करण्यात आलेली नाही. चुकीची रेकॉर्डींग करुन दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे