माळेगाव: ता. बारामती प्रकाश दिगंबर भापकर रा. अजिंक्यनगर माळेगाव बु ता. बारामती जि पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि ०५/१२/२०२४ रोजी सकाळी ११/३० वा च्या सुमारास फिर्यादी व त्यांचे सहकारी मित्र दादासो माने हे त्यांच्या कार्यालयात बसलेले असताना
फिर्यादी यांचे बाळू जाधव यांचेशी पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून त्यांचा मुलगा चेतन बाळू जाधव याने व त्याच्या सोबत आणलेले मित्र मयुर रणजित जाधव, विजय बाळासो कुचेकर सर्व रा माळेगाव बु ता बारामती तसेच दिनेश आडके रा.शिरवली ता.बारामती यांनी कार्यालयात जबरदस्तीने घुसून सोबत आणलेल्या लोखंडी धारदार हत्याराने डोक्यावर दोन्ही हातावर तसेच शरीरावरील इतर ठिकाणी वार करून मला गंभीर जखमी केले तसेच मला सोडवण्यासाठी आलेल्या दादासो माने यास विजय कुचेकर याने ग्लास फेकून मारल्याने त्यांचे डोक्यावर जखम केली व मला शिवीगाळ करून त्याठिकाणावरून निघून जाताना लोक जमा झालेत ‘आता वाचला आहेस पुढच्या वेळी तुला जिवंत सोडणार नाही’ असे बोलून धमकी देवून त्यांनी आणलेल्या दोन दुचाकी मोटार सायकलवरून ते निघून गेले. त्यांनी मला जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न केला व माझ्या शरीरावर वार केले असून माझी वर उल्लेख केलेल्या चौघांविरोधात कायदेशीर फिर्याद आहे असे तक्रारीत नमुद केले आहे.
माळेगांव त्या.बारामती पोलीसांनी भारतीय शस्त्र कायदा कलम 4/25 नुसार कारवाई करत चेतन बाळु जाधव मयुर रणजित जाधव,विजय बाळासो दिनेश आडके यांचेवर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.खटावकर हे करत आहेत


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा