ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
हडपसर विधानसभा उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थात कोंढवा येथे बैठक संपन्न.

0
1
4
5
6
9
कोंढवा, पुणे प्रतिनिधी
कोंढवा पुणे : महायुती घटक पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हडपसर विधानसभा उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थात कोंढवा येथे पारगे नगर, कुमार संसार सोसायटी क्लब हाऊस मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कोंढवा पारगे नगर येथील कुमार संसार,कुमार सब लाईन ,डी एस के गार्डन ,सोसायटी तील मतदारांना महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांना विजयी करण्याचे आवाहन नगरसेविका नंदाताई लोणकर आणि नाना लोणकर यांनी केले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी पाटील साहेब त्याचप्रमाणे नगरसेविका नंदाताई लोणकर, नानासाहेब लोणकर,प्रभाग अध्यक्ष जोयब काझी, यांच्यासह कुमार संसार चेअरमन नवीद मौलवी, कुमार संसार सेक्रेटरी अल्लाबक्ष,डी एस के सोसायटीचे चेअरमन,कुमार सब लाईन सोसायटीचे चेअरमन सय्यद, व अमीर मुल्ला, जाकीरभाई, जावेदभाई, सफी दामाद,अतिर बक्क्षी यांच्या उपस्थितीत हि बैठक पार पडली.