अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी : येथील न्यायालयात इले. मोटार चोरीच्या आरोपातून आरोपी यांची नुकतीच राहुरी येथील न्यायाधिश यांनी निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणी सविस्तर हकीकत अशी की, मल्हारवाडी रोडचे कडेला राहुरी बु., शिवारात फिर्यादीचे विहिरीतील इले. हॉर्स पॉवरची पाणबुडी, इले. मोटार चोरुन नेली. या आरोपातून आरोपी याची मे. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी फिर्यादीने राहुरी येथील पोलीस स्टेशनला आरोपीचे विरुध्द चोरीची फिर्याद दिली. राहुरी पोलीसांनी सदरची फिर्याद नोंदवून घेतली व त्यास गु.र.नं. 1 ६०/२००९ असा क्रमांक दिला. व भा.द.वि.चे कलम ३७९, ३४ अन्वये दि.०३/०३/२००९ रोजी गुन्हा दाखल केला. व तपास तपासी अधिकाऱ्याकडे दिला. तपासी अधिकाऱ्याने सदर केसचा तपास करुन, साक्षीदारांचे जबाब घेऊन पंचनामे करुन सदर गुन्हयाचे दोषारोप पत्र तयार करुन मे. न्यायालयात सादर केले. सदर खटल्यास आर.सी.सी.नं. ९५/२००९ असा क्रमांक पडला. सदर खटला राहुरी येथील सह दिवाणी व फौजदारी न्यायाधिश मयुरसिंह गौतम साहेब यांचेसमोर चालला.

आरोपी तर्फे जेष्ठ विधिज्ञ व नोटरी पब्लिक ॲड. प्रकाश संसारे यांनी काम बघितले. सदर खटला गुण दोषावर चालवून साक्षीदारांचे जबाब झाले व सबळ पुराव्याअभावी आरोपी नामे सतिश राजु भालेराव याची दि.०६/०२/२०२५ रोजी मे. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सदर खटल्याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते.



बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा