Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

जीवघेणा हल्ला करून पळून जाणारे हल्लाखोर ताब्यात

चार तासांत सर्व आरोपी अटक माळेगाव पोलीसांची दबंग कामगिरी 

0 1 4 5 6 9

बारामती : माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात दिनांक ०५/१२/२०२४ रोजी प्रकाश उर्फ पप्पु दिगंबर भापकर रा. अजिंक्यनगर, माळेगाव बु।। ता.बारामती जि.पुणे हे त्यांच्या शिवनगर येथील फायनान्स कंपनीच्या कार्यालयात त्यांचे सहकारी दादासो नारायण भाते यांचेसह बसलेले असताना त्यांचे कार्यालयात अचानकपणे घुसून मागील दिड ते दोन महीन्यापुर्वीच्या जुन्या भांडणाच्या कारणावरुन सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने प्रकाश उर्फ पप्पु दिगंबर भापकर यांच्यावर हल्ला करत त्यांच्या डोक्यात, मानेवर, डाव्या व उजव्या हातावर, तसेच इतर ठिकाणी वार करुन त्यांना गंभीर जखमी करून सोबत हजर असलेले त्यांचे सहकारी दादासो माने हे भापकर यांना सोडविणेसाठी गेले असता त्यांना देखील ग्लास फेकुन मारुन आता वाचला आहेस परत जिवंत ठेवणार नाही असे बोलून हल्लेखोर पसार झाले होते.

माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक श्री.सचिन लोखंडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन माळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन तपास पथके तयार केली व त्यांना सदर घटनेच्या तपासाच्या अनुषंगाने हल्लेखोरांना लवकरात लवकर ताब्यात घेण्याच्या इतर आवश्यक सुचना देवुन तात्काळ रवाना केले.

सदर हल्लेखोर हे गुन्हा करुन दूर फरार होण्याची शक्यता असल्याचे पोलीस तपास पथकाला मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे व परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या सी.सी.टी.व्ही कॅमेरा फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषणातुन सदर घटनेतील हल्लेखोर

चेतन बाळु जाधव,मयुर रणजित जाधव, विजय बाळासो कुचेकर,रा. माळेगाव बु।। ता.बारामती यांना त्यांच्याकडील दोन्ही मोटार सायकल वरुन पळुन जात असताना फलटण नगरपालिका हद्दीतील कचरा डेपो परीसरात पाठलाग करुन ताब्यात घेतले.

त्यांचा उर्वरीत एक साथीदार दिनेश आडके याचा पणदरे ता.बारामती गावच्या हद्दीत शोध घेवुन त्याला सुद्धा ताब्यात घेतले.

सदरची कामगिरी मा.श्री पंकज देशमुख सो. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा.श्री गणेश बिरादार सो, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा.डॉ.श्री सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा.श्री.अविनाश शिळीमकर सो. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखा,पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाणेचे स.पो.नि. श्री.सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक श्री.अमोल खटावकर, श्री.देविदास साळवे, सहा.पोलीस उपनिरीक्षक श्री.शरद तावरे, पो.हवा श्री.अमर थोरात, पो.ना. श्री.ज्ञानेश्वर सानप, पो.काॅ. श्री.नंदकुमार गव्हाणे, श्री.राहुल पांढरे, श्री.विजय वाघमोडे, श्री.अमोल राऊत, श्री.ज्ञानेश्वर मोरे, श्री.जालिंदर बंडगर, श्री.विकास राखुंडे व होमगार्ड श्री.सागर कोळेकर, श्री.विक्रम मदने यांनी केली.

आरोपींचा अगदी शिताफीने तपास करून अटक केल्याने ग्रामस्थांनी माळेगांव पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे