ब्रेकिंग
आपुलकी व जिव्हाळा वाढवणारी स्नेहभेट
शरद पवार यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाकाकी पवार यांची सदोबाचीवाडी येथे स्नेहभेट.

0
1
4
5
6
9
बारामती: सध्या तालुक्यात विधानसभेचे वारे वाहत आहे,
निमित्त काहीही असेल परंतु त्याच निमित्ताने सदोबाचीवाडी ता.बारामती येथील श्री.पर्बतराव होळकर हे प्रतिष्ठित शेतकरी व्यक्तिमत्व अनुभवाने व वयाने जेष्ठ,शरद पवारांचे आणि त्यांचे ही जुने ऋणानुबंध.
आज माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाकाकी पवार यांनी सदोबाचीवाडी येथील जेष्ठ पर्बतराव होळकर यांच्या घरी येऊन होळकर कुटुंबाची स्नेह भेट घेतली दरम्यान कुटुंबातील चिमुकल्या पणतू सोबत गप्पा मारत काकीही दंग झाल्या.
होळकर कुटुंबीय मात्र काकींच्या या प्रेमळ भेटीने भारावून गेले.एकीकडे तालुक्यात विधानसभेच्या प्रचाराचा धुराळा उडाला असताना सदोबावाडीत मात्र ही स्नेहभेट अनोखी ठरली पवार व होळकर कुटुंबीयांसाठी आपुलकी व जिव्हाळा वाढवणारी हि भेट होती.
काकी घरी आल्याने घर अगदी गजबजून गेले होते. काकींनी घरातील सर्व सदस्यांची आस्थेने विचारपूस केली. काकी व पर्बतराव होळकर यांच्या पत्नी सौ.लक्ष्मीबाई यांच्या गप्पा बराच वेळ रंगल्या होत्या.
ही भेट अनौपचारिक होती,गप्पा मात्र जिव्हाळ्याच्या होत्या.राजकारण विरहित ही भेट सहृदयी ठरावी अशीच होती.असे होळकर कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आले.
काकींच्या या भेटीने सदोबाचीवाडी मात्र भारावून गेली होती.