Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

कोंढवा येथे मुस्लिम समाज वधू वर मेळावा संपन्न.

के,जे,एन,खिदमत फाउंडेशन पुणे,यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

0 1 5 6 4 4

पुणे: कोंढवा येथे शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (श प गट ) यांच्या वाढदिवसानिमित्त मुस्लिम समाज वधू वर मेळावा व दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

खिदमत फाउंडेशन पुणे यांच्या वतीने रविवार दिनांक १५/१२/२०२४ रोजी पारगे लॉन्स पारगे नगर कोंढवा खुर्द पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा प्रशांत दादा जगताप (अध्यक्ष राष्ट्रवादी श.प.काँग्रेस,मा महापौर पुणे) आणि प्रमुख उपस्थिती मा.मोहम्मद भाई पानसरे (मा.उपमहापौर पि.चि.मनपा ), नगर सेवक गफूरभाई पठाण, नगरसेविका हसीना इनामदार, मौलाना रईस हे उपस्थित होते.

प्रास्ताविकात हाजी मुबारकभाई शेख (सचिव) यांनी  फाऊडेशनची स्थापना कधी झाली व पुन्हा फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत काय काय कामे करण्यात आली त्याविषयी माहिती दिली, तसेच फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी अशा मेळाव्याचे आयोजन करण्यात येते व त्याचा समाजातील बांधवांना फायदा होतो ही गोष्ट अधोरेखित केली. छोट्या रोपट्याचे आता मोठ्या झाडांमध्ये रूपांतर झाले आहे. असेही त्यांनी बोलताना सांगितले.

दरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार फाऊंडेशनचे अध्यक्ष दस्तगीरभाई (बापु) मुलानी यांनी केले.या प्रसंगी  फाउंडेशन च्या वतीने नवीन इस्लामिक कॅलेंडरचे अनावरण प्रमुख अध्यक्ष माननीय प्रशांत दादा जगताप यांच्या हस्ते  करण्यात आले.

या प्रसंगी फाउंडेशनचे उपाध्यक्ष हाजी गफूर भाई पानसरे त्याचप्रमाणे कोंढवा शाखेचे अध्यक्ष हाजी नासिरभाई इनामदार, शकीलभाई पानसरे, मुसाभाई काजी, हनीफ भाई पठाण, बाबूलालभाई शेख, युसूफभाई सय्यद,शकूरभाई शेख, अन्वरभाई पानसरे, हाजी बाबाभाई इनामदार परिंचे ,मान्यवर उपस्थित होते.

प्रशांत जगताप यांनी फाउंडेशनचे माहिती घेऊन फाउंडेशनच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले व  त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

मेळाव्याच्या प्रमुख उपस्थितत राजेंद्र भिताडे हे होते.

फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने राजस हुसेन मुलानी , अजिजभाई शेख, साहिलभाई शेख, पृथ्वीराज पांडुळे गुन्हे अन्वेषण शाखा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे वसीम राज मोहम्मद इनामदार येरवडा सेंट्रल जेल मुख्य जेलर यांचा सत्कार करण्यात आला.युनूसभाई शेख (चाचा),

निलोफर गफूर शेख आदर्श नर्सिंग प्राविण्य, फरान जमीर शेख इंटरनॅशनल आर्ट कल्चरल,अदलान सोहेल कडेकर अबॅकस उत्कृष्ट खेळाडू ,

नाज रशीदभाई शेख आयटी इंजिनियर एम एस ऑस्ट्रेलिया गव्हर्मेंट शिष्यवृत्ती निवड, जुबेरभाई चाऊस,आसिया आपा अन्सारी, मुस्तफा अब्बास भाई सय्यद, शब्बीर भाई मुल्ला, इकबाल भाई मुल्ला, ताजुद्दीन भाई इनामदार बाबूलाल भाई शेख, कुरेशी शेख सुलतान सलाउद्दीन शहाबुद्दीन आदर्श उर्दू शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.

विशेष सहकार्य हाजी फिरोज भाई सय्यद, एडवोकेट साहिर बागवान, मजहर पानसरे ,मुबीन पानसरे, नासिर पानसरे, मुजफ्फर पानसरे, इरफान इनामदार, इमरान इनामदार, मुजम्मिल पानसरे यांचे लाभले.

कोंढवा खिदमत फाउंडेशनच्या सर्व सभासदांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून येणाऱ्या सर्व बंधू भगिनींचे सुमारे दोन हजार लोकांचे जेवणाचे नियोजन व बाराशे मुला मुलींचे नोंदणीचे विवाह काम चांगल्या पद्धतीने केले.

पिंपरी शाखा, हडपसर शाखा, कोंढवा शाखा सासवड शाखा, फाउंडेशनच्या या सर्व शाखांच्या सभासदांनी जे सहकार्य केले त्याबद्दल कोंढवा शाखाध्यक्ष हाजी नासिरभाई इनामदार यांनी सर्वांचे आभार मानले व पुढे अशीच सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे