ब्रेकिंगमहाराष्ट्र
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
पोलीसांचे प्रश्न सोडविण्यासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी संघटीत व्हावे. - सुरेश गायकवाड

0
1
4
5
6
9
पुणे: अप्पर पोलीस महासंचालक, श्री.चिरंजीव प्रसाद (भा.पो.से) राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य मुंबई, यांच्या संकल्पनेतून सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांसाठी स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख उपस्थितीत मा.श्री अशोक मोराळे (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, परिक्षेत्र पुणे.हे होते.
पुण्यातील एस आर पी एफ गट २ च्या ‘आलंकारण लॉन’, पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.या स्नेह संमेलनासाठी सेवानिवृत्त समादेशक, सहायक समादेशक, पोलीस निरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी, कार्यालयीन अधीक्षक इत्यादींनी आवर्जून उपस्थिती लावली होती.
अप्पर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद यांनी या कार्यक्रमाविषयी समाधान व आनंद व्यक्त करुन भविष्यातील अशा स्नेह संमेलनास असाच प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त केली.
दरम्यान सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांच्या वतीने स्वराज्याचा जाहीरनामा चे कार्यकारी संपादक आणि सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुरेश गायकवाड (महाराष्ट्र पोलिस गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना त्यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पूर्वी प्रमाणे वैद्यकीय सेवा तसेच औषध-उपचार मिळावेत या प्रमुख मागणीसह १०,२०,३० पदोन्नतीचा पोलीस अंमलदार यांना फायदा मिळावा आणि भविष्यात सेवानिवृत्त होणाऱ्यांना वेळेत पेन्शन मिळावी अशा अपेक्षा व्यक्त केल्या.
विशेष बाब म्हणजे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी ग्रुप पुणे मधील सर्वांना एकत्र करण्याचे काम सेवानिवृत्त सहा.पोलिस उपनिरीक्षक श्री.अनिल शिंदे यांनी केले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त समादेशक,जानराव. ईश्वर चौधरी, पोलीस उपाधीक्षक, डी.आर.डामसे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहा.समादेशक एम,आर,गवारी साहेब यांनी केले. सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना स्नेह संमेलनास निमंत्रण दिल्याबदल सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने गट २ च्या समादेशक, नम्रता पाटील मॅडम यांनी आभार व्यक्त केले.
संमेलनाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली.