आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
वडगाव निंबाळकर (बारामती) चा देशात नव्हे तर जगात डंका. एसआयपी अबॅकस स्पर्धेत चि.शिवराज शितोळे “चॅम्पियन बॉय”
कोलकाता येथे एसआयपी अबॅकस स्पर्धेत चि.शिवराज रेखा सचिन शितोळे याने अकरा देशांमधून आलेल्या स्पर्धकांमध्ये बाजी मारत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय या दोन्ही प्रकारात 'चॅम्पियन पद' मिळवले.

0
1
4
5
6
9
वडगाव निंबाळकर: कोलकाता येथे एसआयपी अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अकरा देशांमधून आलेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता, यामध्ये प्रामुख्याने भारत, श्रीलंका, फिलिपिन्स, यूएई(दुबई), ताझांनिया, बहरीन, बांग्लादेश, न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका व नेपाळ या देशांचा सहभाग होता.
या स्पर्धेमध्ये सोमेश्वर विद्यालय,सोमेश्वरनगर येथे इयत्ता सातवीत शिकत असलेला विद्यार्थी ‘चि.शिवराज रेखा सचिन शितोळे’ हा विद्यार्थी सहभागी होता.११ देशांमधून आलेल्या स्पर्धकांमध्ये बुद्धिमत्ता व कौशल्याच्या आधारावर तीन स्तरावर स्पर्धा घेण्यात आली,यामध्ये स्तर तीन मध्ये चि. शिवराज शितोळे यांनी बाजी मारत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारांमध्ये ‘चॅम्पियन पदक’ मिळवले व या स्पर्धेमध्ये विजयाची बाजी मारली.
हे यश संपादन करून शिवराजने वडगाव निंबाळकर या आपल्या गावाचे तसेच आत्ता शाळेनिमित्त राहत असलेल्या सोमेश्वरनगर सह आपल्या शाळेचे, तालुक्याचे नाव देशातच नव्हे तर जगभरात पोहोचवले त्याबद्दल सर्वच स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे,हे भव्य असे यश मिळवल्याबद्दल वडगाव निंबाळकर चे समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशीतून त्याच्यावर कौतुकाचा तसेच अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या यशासाठी त्याला रूपाली पवार व धनश्री आंबवले यांचे मार्गदर्शन लाभले.
चिरंजीव शिवराज शितोळे यांनी मिळवलेल्या यशाची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी देखील घेतली,अजितदादा पवार यांनी विधानसभा निवडणूक प्रचार दौऱ्यानिमित्त गाव भेटी दरम्यान वडगाव निंबाळकर येथील सभेमध्ये आपल्याच तालुक्यातील मुलाने गावाचे तसेच तालुक्याचे भारत देशामध्ये नाव मोठे केले हि गौरवास्पद घटना आहे असे सांगितले,व चि.शिवराजचे अभिनंदन केले.
चि.शिवराज व त्याची आई सध्या कोलकाता येथे असल्याने त्याच्यावतीने वडील श्री.सचिन शितोळे यांचा हार,शाल व पुष्पगुच्छ देत सन्मान केला व शिवराजला त्याच्या पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
आजच्या या स्पर्धेच्या युगात मुलांवर योग्य ते संस्कार करत, मुले शिकत असलेल्या व करत असलेल्या गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्यासाठी मेहनत घेतली तर आपली मुलं नक्कीच चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतात.
श्री.सचिन शितोळे, चि.शिवराजचे वडील.