
बारामती : दिनांक १२/०३/२०२५ रोजी सौ,विजया श्रीनिवास प्रभुणे वय ५१ वर्ष रा.अनुज अपार्टमेंट हरिकृपानगर इंदापूर रोड बारामती, या नेहमी प्रमाणे सकाळी पायी चालण्याच्या व्यायामासाठी फिरत असताना शहरातील खलाटे हॉस्पीटल शेजारी आल्या असता त्यांच्या पाठीमागून दोन हेल्मेट घातलेले मोटर सायकलस्वार आले व त्यांनी प्रभुणे यांच्या गळ्यातील व्रील वर्णनाचे व किंमती सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून चोरुन निघून गेले.

याबाबत त्यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात दुचाकी वरील अज्ञात इसमांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

पुढील तपास बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक,श्री.भिताडे करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा