निंबूत:फिर्यादी किरण ज्ञानदेव मोरे(लेखापरिक्षक)रा.मु.पो.पारगाव (सालू-मालू)ता.दौंड जि.पुणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.०१/०४/२०२० ते ३१/०३/२०२३ दरम्यान मौजे निंबुत येथील श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था निंबुत.ता बारामती जि पुणे.येथील संस्था सचिव,सतिश वसंतराव काकडे,व संस्था लेखनिक,निलेश नरहरी कुलकर्णी,यांनी त्यांच्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करुन या पतसंस्थेमध्ये सभासदांनी जमा केलेली १,२२,२९,८०५/-(एक कोटी बावीस लक्ष एकोणतीस हजार आठशे पाच)

इतकी रक्कम जमा केली असताना सुद्धा ती रक्कम आरोपी यांनी त्यांच्या संस्थेच्या बँकेत भरणा न करता दप्तरी दिशाभुल करणारे खोटे
जमा खर्च व बनावट व्यवहार नोंदी करून जाणीव पुर्वक खोटे व्यवहार नोंदवून संस्था व नमुद संस्था सभासद यांची फसवणुक व विश्वासघात केला आहे.

आरोपी यांनी
संस्थेचे एकुण १,२२,२९,८०५/-(एक कोटी बावीस लक्ष एकोणतीस हजार आठशे पाच)रुपये रक्कमेचा स्वत:च्या फायद्यासाठी गैरव्यवहार करुन अपहार केला आहे,अशी
लेखा परिक्षक यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून. सदरचा गुन्हा रजिस्टरी दाखल केला आहे. गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो.कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना करण्याची तजवीज करण्यात आली आहे.
दाखल अंमलदार, पो,हवा,कुलकर्णी तसेच
तपासी अंमलदार,पोसई,आर.एम.साबळे हे पुढील तपास करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा