अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्र
राहुरी फॅक्टरी आंबेडकर चौकामध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा.

0
1
4
5
6
9
अ.नगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी: तालुक्यातील राहूरी फॅक्टरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सालाबादप्रमाणे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.चौकात प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पूष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.माजी सनदी अधिकारी दत्तापाटील कडू,साई आदर्श संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे,जागर जनस्थान चे प्रतीनीधी राजेंद्र साळवे यांचे हस्ते प्रतीमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
संविधान हा पवित्र ग्रंथ आहे,या संविधानामूळेच आपण गुण्यागोविंदाने राहतो.सर्वांनी संविधानाचा आदर करून संविधान प्रती सन्मान ठेवायला पाहिजे असे उद्गार माजी सनदी अधिकारी दत्तापाटील कडू यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
यावेळी शिवाजीराव कपाळे,ॲड.सतीष देशमुख, देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आदिनाथ कराळे,वैभव गिरमे, प्रदीप गरड, डॉ पांडूरंग मूसमाडे,शांती चौकचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन,प्रहारचे चंद्रकांत कराळे, कॉंग्रेसचे तैनूरभाई पठाण, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आप्पासाहेब कोहकडे, भास्कर कोळसे, सोपान कोहकडे, पत्रकार जालिंदर आल्हाट,सूनील विश्वासराव,शरद साळवे,चैतन्य आल्हाट,पप्पू बर्डे,प्रभाकर कांबळे,सतीष संसारे,पिनू झावरे, मनोज वाघ, राजेंद्र विधाटे आदि संविधान प्रेमी मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते,
यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.