पुणे: निलेश भिंतरे स्पोर्ट्स फाउंडेशन ने नुकत्याच U-17 (सतरा वर्षाखालील) एन बी ट्रॉफी पुणे, यांनी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले होते, या मध्ये बारामतीच्या पार्थ शिंदे याने अष्टपैलू खेळ खेळत ब्रिलियंट क्रिकेट अकॅडमी येवलेवाडी या आपल्या संघाला चषक मिळवून दिला.

सेमी फायनल मॅच २७ डिसेंबर २०२४ ब्रिलियंट क्रिकेट अकॅडमी येवलेवाडी या ग्राउंड वर खेळवण्यात आली. या मॅच मध्ये धावांचा पाठलाग करताना योगेश इलेव्हन या संघाविरुद्ध पार्थ शिंदे याने २६ चेंडूत मध्ये ५८ धावा केल्या आणि एक विकेट घेत आपल्या संघाला एक हाती विजय प्राप्त करून दिला.

शेवटची स्पर्धा ३१ डिसेंबर २०२४ रोजी शिंदे हायस्कूल या मैदानावर खेळवली गेली व ती youtube लाईव्ह खेळवण्यात आली.

या मॅच मध्ये ब्रिलियंट संघाने २३६ गावांचे आव्हान स्पेसिलाइज क्रिकेट क्लब पुणे यांना देण्यात आले होते. परंतु पार्थ शिंदे यांच्या गोलंदाजी पुढे स्पेशलाइज क्रिकेट संघ अवघ्या १०३ धावामध्ये आटोपला.
यामध्ये पार्थ शिंदे याने चार फलंदाज बाद करुन मॅन ऑफ द मॅच हा किताब त्याने पटकावला,
तसेच बेस्ट बॉलर हा सुद्धा किताब पटकावला. स्पर्धेमध्ये मध्ये नितीन सामल यांचे ब्रिलियंट क्रिकेट अकादमीच्या मुलांना मार्गदर्शन मिळाले.

या यशात माझ्या एकट्याचाच वाटा आहे असे म्हणता येणार नाही,हे यश माझ्या पुर्ण संघाचे व मार्गदर्शकांचे आहे अशी भावना या वेळी पार्थ याने व्यक्त केली.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा