अपघातगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या वतीने मोबाईल व किंमती मुद्देमाल मुळ अर्जदारांना परत- एकुण २,८४,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल परत
मा.श्री. अजित पवार सो, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या वतीने गहाळ मोबाईल व किंमती मुद्देमाल असे एकुण २,८४,५००/- रुपये मुळ अर्जदार यांना परत करण्यात आले.

0
1
4
5
6
9
बारामती: मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा १०० दिवसांचा कार्यक्रम योजनांच्या अनुषंगाने मा. श्री. पंकज देशमुख साो,पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा. श्री. गणेश बिरादार सो, अप्पर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, मा. श्री. डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी,बारामती उपविभाग यांनी पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आलेल्या किंमती मुद्देमाल तसेच इतर मुद्देमाल मुळ अर्जदार यांना कायदेशिर प्रक्रीया पुर्ण करुन त्यांना परत देवुन निर्गती करण्याबाबत आदेश करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने दि. २६/०१/२०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मा. उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांचे हस्ते तसेच मा. श्री. दत्तात्रय भरणे क्रिडा व अल्पसंख्यांक व औकाफ महाराष्ट्र राज्य मंत्री यांचे हस्ते मूळ मालकांना त्यांचे मोबाईल व मुद्देमाल परत करण्यात आला.
वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे सन २०२३-२०२४ या कालावधीतील नोंद गहाळ मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करुन शोध घेवुन एकुण २० मोबाईल किंमत अंदाजे २,३७,०००/- रुपये चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला होता.सदरचे मोबाईल तसेच मुद्देमाल वालचंदनगर पोलीस स्टेशन १) गु.र.नं. २६/२०२२ भा.द.वि. ४५७,३८० मधील चोरीस गेलेला २,५००/- किंमतीचा मुद्देमाल, २) गु.र.नं.१२३/२०२३ भा.द. वि. ४५७,३८० मधील चोरीस गेलेला १३,०००/- किंमतीचा मुद्देमाल, ३) गु.र.नं.२०३/२०२४ भा.द.वि. ४५७,३८० मधील चोरीस गेलेला २७,०००/- किंमतीचा मुद्देमाल, ४) गु.र.नं.८७/२०२२ भा.द. वि. ३७९ मधील चोरीस गेलेला ३०००/- किंमतीचा मुद्देमाल ५) गु.र.नं.५६६/२०२२ भा.द.वि. ३७९ मधील चोरीस गेलेला २,०००/- किंमतीचा मुद्देमाल, असा एकुण २,८४,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला.
सदाशिव मोहळकर शिक्षण संस्था व नंदिकेश्वर विद्यालय व ज्युनि. कॉलेज जंक्शन ता.इंदापुर, जि.पुणे येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन मोबाईल व मुद्देमाल मुळ अर्जदार यांना परत देण्यात आले.
अर्जदार यांना त्यांचे मोबाईल व चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
सदरची कामगिरी मा. श्री. पंकज देशमुख साो, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा. श्री. गणेश बिरादार सो, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, मा. श्री. डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली राजकुमार डुणगे, सहा. पोलीस निरीक्षक, वालचंदनगर पोलीस स्टेशन मोनिका शरद मोहिते, महिला पोलीस हवालदार, महिला पोलीस हवालदार ललिता पोमणे, महेश पवार पोलीस नाईक, जगदिश सुर्यकांत चौधर पोलीस हवालदार, दत्तात्रय चांदणे पोलीस हवालदार, विक्रमसिंह जाधव, पोलीस अंमलदार, ज्योती डिसले महिला पोलीस अंमलदार यांनी पार पाडली आहे.
सदर कामगिरीमुळे नागरिकांमध्ये पोलीसांची प्रतिमा उंचावलेली असुन पोलीसांच्या कामाचे कौतुक होत आहे वरिष्ठांनी देखील पोलिसांच्या कामगिरीबद्दल वालचंदनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले.