Breaking
कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र

डॉ.तनपुरे साखर कारखान्याच्या कामगार वसाहतीमध्ये बेकायदेशीर वास्तव्य,

प्रशासकीय अधिकारी यांनी लक्ष घालावे,

0 1 4 5 6 9

नव्याने रुजू झालेले प्रशासकीय अधिकारी यांच्यापुढे मोठे आव्हान

अ.नगर जिल्हा प्रतिनिधी

अ.नगर :  जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यात असणाऱ्या डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे सह .साखर कारखान्याच्या कामगार वसाहतीमध्ये अत्यंत बेकारीचे हाल चालू असल्याचे दिसून येत असल्याने डॉ .तनपुरे कारखान्यावर नव्याने रुजू झालेले प्रशासकीय अधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणीकामगार वसाहत मध्ये राहणारे सेवानिवृत्त कामगारांनी केली आहे

डॉ .तनपुरे सह .साखर कारखाना गेली सात ते आठ वर्षापासून बंद असल्याने कारखान्यात काम करणाऱ्या व कामगार वसाहत मध्ये राहणाऱ्या काही कामगारांनी आपल्या गावाकडे जाणे पसंत केले तर काही कामगारांनी स्वतःच्या नावे असणाऱ्या कामगारवसाहती मधीलखोल्या ( रूम )कारखान्याकडे जमा केल्या तर काही कामगारांनी तशाच आपल्या नावे ठेवल्या आहेत काही कामगार अजूनही एखाद्या चमत्काराच्या प्रतीक्षेत असून कारखान्याकडून मिळणाऱ्या थकित पैशावर अजूनही काहींनी आयुष्याची गणित मांडली आहेत पण त्याचा भागाकार पूर्ण जाऊन बाकी शून्य आणि शून्यच उरत आहे.


कामगार वसाहतीची आत्ताची परिस्थिती पाहताअक्षरशः कामगार वसाहत मध्ये विज बिल थकल्याने विज नाही तर देवळाली प्रवरा नगरपालिकेची लाखोंची पाणीपट्टी बाकी आहेकामगार वसाहत मध्ये आत्ताच्या स्थितीला फक्त 20 ते 25 टक्के कामगार हे अधिकृतपणे राहत असूननव्याने रुजू झालेले कारखाना प्रशासकीय अधिकारी यांनी कामगार वसाहत मध्ये सर्वे केल्यास त्यांना 70 ते 75 टक्के लोक हे अधिकृत कामगार नसल्याचे व कुणाचीही परवानगी न घेता कामगार वसाहत मध्ये राहत असल्याचे खात्रीशीर कळेल बाहेरून आलेल्या काही कुटुंबीयांनी तर चक्क कामगार वसाहत मध्ये कब्जा केलेला दिसून येतो तर काहींनी कामगार वसाहत मधील खोल्यांचे कडी कोयंडा तोडून आपले बस्तान कामगार वसाहत मध्ये बसविले आहे काहींनी तर चक्क कामगार वसाहती मधील खोल्यांचे दरवाजे खिडक्या विटा फरची चोरून नेलेली आहे.

सदर कारखाना हा अहमदनगर जिल्हा बँकेच्या ताब्यात असून या ठिकाणी जिल्हा बँकेमार्फत सुरक्षा देण्यात आलेली आहे परंतु हे सुरक्षारक्षक फक्त कारखाना .पेपर मिल .सेंटर ऑफिस .छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याच ठिकाणी दिसून येतात तसे पाहता कामगार वसाहत ही पण कारखान्याशी सलग्न असून सदर जिल्हा बँकेने दिलेल्या सुरक्षारक्षकांनी कामगार वसाहतीमध्ये सुरक्षा देणे गरजेचे आहे तरी नव्याने रुजू झालेले प्रशासकीय अधिकारी यांनी ह्या कामगार वसाहतीमध्ये जातीने लक्ष घालून जे कामगार वसाहतीमध्ये बेकायदेशीर राहत आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक कामगार करत आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे