Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकुने केले वार

आरोपी विरुद्ध राहुरी पोलीसांत गुन्हा दाखल

0 1 4 5 6 9

अ,नगर जिल्हा प्रतिनिधी

राहुरी अहिल्यानगर: चारित्र्य संशयाच्या कारणावरून गळ्यावर वार करून डोक्यात दगडाने जबरदस्त मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा परिसरात काल दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली.

राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे आरोपी नारायण बाजीराव चव्हाण हा कुटूंबासह राहत होता. आरोपी नारायण हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन कायमच तीच्याशी वाद घालत होता. काल दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजे दरम्यान आरोपी नारायण चव्हाण याने त्याची पत्नी मंदा नारायण चव्हाण हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घातला. त्यावेळी पती पत्नी मधील वाद अगदीच विकोपाला गेला. तेव्हा आरोपी नारायण याने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केला. नंतर मोठा दगड घेऊन पत्नीच्या डोक्यात तीन ते चार वेळा मारला. त्यानंतर आरोपी घराला बाहेरुन कडी लावून पसार झाला होता. त्यांची मुले शाळेतून घरी आल्यावर त्यांनी घराची कडी उघडून पाहिले असता मंदा चव्हाण या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. या घटनेत पत्नी मंदा चव्हाण ही गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पुणे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाला होता. त्यानंतर हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, गणेश सानप, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सतिष कुऱ्हाडे, सचिन ताजणे, सचिन ठोंबरे, भगवान थोरात आदि पोलिस पथकाने दि. २६ नोव्हेंबर रोजी दुपारच्या दरम्यान आरोपी नारायण बाजीराव चव्हाण याला सोनई येथून आरोपी हरीभाऊ बाजीराव चव्हाण याला पुणे येथून तर आरोपी रुक्मिनी बाजीराव चव्हाण हिला राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिस उप निरीक्षक समाधान फडोळ व हवालदार रवींद्र कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मंदा चव्हाण यांच्या नातेवाईकांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला फाशी देऊ. असे म्हणत प्रचंड आक्रोश केला.

या घटने बाबत जखमी मंदा नारायण चव्हाण यांचा भाऊ भगवान दादाराव जाधव, रा. वाघोली, पुणे याने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी नारायण बाजीराव चव्हाण, हरीभाऊ बाजीराव चव्हाण, रुक्मिणी बाजीराव चव्हाण यांच्यावर गुन्हा रजि. नं. १२२० भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१), ११५ (२), ११८ (२), ३५१ (२), ३५१ (३) प्रमाणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक समाधान फडोळ हे करीत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे