
बारामती : माळेगाव पोलीस कार्यक्षेत्रांतर्गत शाळा व महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, परिणामी या परिसरात विद्यार्थ्यांची ये जा मोठ्या प्रमाणात असते,
मागील काही दिवसात शाळा व कॉलेज परिसरात रोड रोमिओंच्या घटना तसेच निष्काळजीपणे वाहन चालवणे, यासारख्या घटना तसेच छोटे मोठे रस्ते अपघात अशा घटना घडल्याचे निदर्शनास आले असल्याने माळेगाव पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक श्री.सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली.
त्या अनुषंगाने माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा व कॉलेज परीसरात पहाणी करून परीसरात वावरणारे रोड रोमिओ, विनापरवाना वाहन चालवणे, वाहनांवरील फॅन्सी नंबर प्लेट ,कर्णकर्कश आवाजात हॉर्न वाजवत वाहन चालवणारे अशा दुचाकी चालकांवर वर २९/०१/२०२५ रोजी कारवाई करण्यात आली.

या कारवाईत ८० वाहतुक केसेस दाखल करण्यात आल्या व ८७००० रूपये दंड आकारण्यात आला.
कारवाई दरम्यान दुचाकी चालक व त्यांच्या गाड्या पोलीस स्टेशनला आणुन विद्यार्थी व त्यांच्या पालकांना बोलावून घेऊन त्यांना योग्य त्या सूचना करून तसेच विद्यार्थ्यांचे समुपदेशन करुन परत त्यांच्या ताब्यात देण्यात आल्या.

विद्यार्थ्यांना कमी वयात तसेच विनापरवाना गाडी चालवण्यास देवु नये अशा कडक सुचना देवून ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनांवर दंड आकारण्यात आला व सदर गाड्या या त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्या.

माळेगाव पोलिसांनी राबवलेल्या या विशेष मोहिमेत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक,श्री.सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक पोलीस हवा, पाटोळे,दडस ,खंडागळे ,महिला पोलीस हवा. रुपाली धिवार, जाधव ,डेरे , पोलीस ना, सानप,पोलीस हवा,कुटे,राखुंडे,सुर्यवंशी यांनी कारवाई केली.



बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा