Breaking
अपघातआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

स्वातंत्र्य विद्यामंदिर प्रशालेत व वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.  

0 1 4 5 6 9

बारामती: वडगाव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे तसेच वडगांव निंबाळकर ग्रामपंचायत येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला, 

ध्वजारोहण कार्यक्रमसाठी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय जयप्रकाशजी जयवंतराव जगताप सर, कार्याध्यक्ष, श्री.महेशकुमार आगम सर, जनरल सेक्रेटरी श्री.सुभाषजी जावळे सर, ग्रामीण सदस्य व प्रशालेचे प्राचार्य श्री. हेमंत तांबे सर,पर्यवेक्षक व माजी जॉईंट सेक्रेटरी श्री.हेमंत बगनर सर, उपसरपंच सौ. संगीताताई शहा, माजी जनरल सेक्रेटरी श्री.लालासाहेब भुजबळ सर, माजी प्राचार्य श्री सुदाम हिरवे सर,श्री.पुंडलिक रासकर सर, श्री. सुरेश आगम सर, माजी प्राचार्य श्री. अनिल रासकर सर, सेवानिवृत्त शिक्षक श्री. बाळासाहेब गायकवाड सर उपस्थित होते.

वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत या ठिकाणी ध्वजारोहणासाठी प्रमुख अतिथी म्हणून जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय जयप्रकाशजी जगताप सर, जनरल सेक्रेटरी श्री सुभाषजी जावळे सर व कार्याध्यक्ष श्री महेश कुमार आगम सर उपस्थित होते.

ध्वजारोहण झाल्यानंतर  विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन घेण्यात आले. वडगाव निंबाळकर गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय श्री.सुनील ढोले, उपसरपंच, सौ.संगीताताई शहा व सर्व सदस्य यांनी उपस्थित सर्व जनता शिक्षण संस्थेचे आजी माजी पदाधिकारी यांचा यथोचित सन्मान केला. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त व आदर्श शिक्षक श्री.सी एम जाधव सरांनी केले.स्वातंत्र्य विद्यामंदिर प्रशालेच्या इमारतीच्या नूतनीकरण व प्रगती बाबत जनरल सेक्रेटरी श्री. सुभाषजी जावळे सर यांनी ग्रामस्थांना सविस्तर वृत्तांत आपल्या मनोगतातून व्यक्त केला. याचबरोबर संस्थेच्या विकासासाठी आर्थिक मदतीची हाक दिली. या हाकेला ग्रामस्थांनी भरभरून साथ दिली.

सरपंच, उपसरपंच, तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील अनेक मान्यवरांनी ६८,५०० रुपयाची देणगी जाहीर केली.

खालील देणगीदार मान्यवरांनी संस्थेसाठी व शाळेच्या विकासासाठी आर्थिक मदत जाहीर केली.

१)सरपंच श्री सुनील ढोले १०००० रु

२)उपसरपंच सौ.संगीताताई शहा ५००० रु

३) प्राचार्य श्री हेमंत तांबे सर, जनता शिक्षण संस्था,ग्रामीण सदस्य,११००० रु

४) सी एम जाधव सर,५००० रु

५) ॲड. मिलिंद बोकील,५००० रु

६)मारुती नाना पानसरे,५००० रु

७) जितेंद्र पवार,५००० रु

८) हनुमंत बनकर,१०००० रु

९) पंडित नाना दरेकर,५००० रु

१०) बापूराव दरेकर,२५०० रु

११) बाळासाहेब शिंदे,५००० रु

१२) श्री.राहुल आगम ग्रामपंचायत सदस्य यांचे कडून सर्व खेळाडूंना आर्थिक मदत (खर्च) जाहिर केला.

यानंतर प्रशालेत पालक सभा घेण्यात आली यावेळी पालकांनी प्रशालेच्या इमारतीचे केलेल्या नूतनीकरणाबाबत समाधान व्यक्त करून सर्व संस्था पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. 

प्रशालेची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू असे अध्यक्ष आदरणीय जयप्रकाशजी जगताप सर यांनी सांगितले. पालकांच्या शाळेबाबत अनेक अपेक्षा समजून घेऊन यावर जनरल सेक्रेटरी सुभाषची जावळे सर यांनी संस्थेच्या वतीने प्रशालेस संगणक लॅब व सुसज्ज असे स्वच्छतागृह बांधण्याचे भूमिपूजन लवकरच करण्यात येईल अशी घोषणा केली. 

या पालक सभेस सरपंच श्री सुनील ढोले, सदस्य, ग्रामस्थ सेवानिवृत्त शिक्षक श्री. सी एम जाधव सर, सेवानिवृत्त शिक्षक श्री.बाळासाहेब गायकवाड सर, जेजुरी प्रशालेचे श्री.महेश तांबे सर उपस्थित होते. पालक सभेत पालकांनी शाळेच्या विकासासाठी देणगीच्या स्वरूपात नक्कीच मदत करू असे सांगितले. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत सविस्तरपणे प्राचार्य हेमंत तांबे सरांनी माहिती दिली. या पालक सभेत स्वागत व परिचय श्री. मोहन गायकवाड सर यांनी केले तर शिक्षक प्रतिनिधी श्री.पोपट नाळे सरांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे