आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धेत स्वातंत्र्य विद्या मंदिर या प्रशालेतील विद्यार्थ्यांचे दैदीप्यमान यश.

0
1
4
5
6
9
पुणे: जिल्हा परिषद पुणे आयोजित, जिल्हा स्तरीय क्रिडा(मैदानी) स्पर्धा बालेवाडी,पुणे या ठिकाणी संपन्न झालेल्या स्पर्धेत जनता शिक्षण संस्थेच्या स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगाव निंबाळकर या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान असे यश संपादन केले आहे.व त्यांची अहमदनगर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावर निवड झालेली आहे.
यामध्ये १९ वयोगटात
कुमारी अनिता लालासाहेब ठोंबरे हिने अनुक्रमे
१०० मीटर धावणे,तृतीय क्रमांक
१०० मीटर धावणे हर्डल, द्वितीय क्रमांक
२०० मीटर धावणे-प्रथम क्रमांक
(पुणे जिल्हा) विभागासाठी निवड.
कु.वनिता लालासाहेब ठोंबरे ४०० मीटर धावणे प्रथम क्रमांक (पुणे जिल्हा) विभागासाठी निवड.
कु. संध्या लालासो ठोंबरे १५०० मीटर धावणे प्रथम क्रमांक (पुणे जिल्हा) विभागासाठी निवड.
कुमारी वनिता लालासो ठोंबरे.३००० मीटर धावणे, प्रथम क्रमांक (पुणे जिल्हा) विभागासाठी निवड.
कुमारी श्रुती संतोष गायकवाड ८०० मीटर धावणे प्रथम क्रमांक (पुणे जिल्हा)
सांघिक स्पर्धा-
४x४०० रिले प्रकारात पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक व ४ ×१०० मीटर धावणे रिले – प्रथम क्रमांक मिळवून अहमदनगर विभागासाठी निवड झालेल्या विद्यार्थिनी
१)अनिता लालासो ठोंबरे
२)वनिता लालासो ठोंबरे
३)श्रुती संतोष गायकवाड
४)संध्या लालासो ठोंबरे
५)चैत्राली उमेश चव्हाण
तर कुमारी चैत्राली उमेश चव्हाण,हिने उंचउडी प्रकारामध्ये मध्ये पुणे जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे व तिचीही विभागासाठी निवड झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांनींनी जे घवघवीत यश मिळवून शाळेचा आणि संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे त्याबद्दल गौरवास्पद व शालेय शिक्षणासोबत मैदानी खेळातही विद्यार्थ्यांमध्ये प्रगती होत आहे ही समाधानाची बाब आहे अशी भावना प्रशालेचे प्राचार्य श्री तांबे सर यांनी व्यक्त केली.
या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शक करणारे शिक्षक श्री. संजय झराड सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे श्री. निलेश दरेकर सर सौ.भुंजे मॅडम यांचे प्रशालेचे पर्यवेक्षक श्री बगनर सर आणि प्रशालेचे प्राचार्य हेमंत तांबे सर यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.