बारामती : श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम २०२४-२५ सुरू होवुन ४४ दिवस झाले तरी देखील कारखान्याने अद्यापपर्यंत पहिली उचल जाहीर केली नाही. तरी खालील मागण्यांचे निवेदन देण्यासाठी शनिवार दि. २८/१२/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा स्थळ, मल्लाप्पा हॉटेल सोमेश्वरनगर येथे सर्व सभासदांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

या मागण्या साठी होणार आंदोलन

१) हंगाम २०२४/२५ ची पहिली उचल एकरक्कमी ३३००/- रू प्र.मे.टन व्याजासह तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावी.
२) कारखान्याने गेटकेन उसाचे गाळप पुर्णपणे बंद करावे व सभासदांच्या उसास प्राधान्य द्यावे. कारण कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांचा उस संपल्याशिवाय गेटकेन उस घ्यायचा नाही असा ठराव झाला असताना गेटकेन उस येतोच कसा? तरी एक आठवड्याच्या आत बाहेरील सर्व टोळ्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आणण्यात याव्यात. गेटकेन उस कारखान्याची उस तोडणी व वाहतुक यंत्रणा आणत नसेल तरी सुध्दा गेटकेन उस घेवु नये. याचे कारण बाहेरून गेटकेनचा उस आल्याने सभासदांच्या उस तोडी लांबत चालल्या आहेत व वाहनतळावर वाहने खाली होण्यास उशीर होत असल्याने उस वाळत आहे.

पुढील ७ दिवसाच्या आत वरील मागण्यांबाबत अंमलबजावणी तात्काळ न केल्यास नाईलाजस्तव काटाबंद आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी चेअरमन/संचालक मंडळावर राहील याची नोंद घ्यावी.
असे आवाहन श्री.सतिशराव शिवाजीराव काकडे अध्यक्ष शेतकरी कृती समिती पुणे जिल्हा यांनी एका पत्रकातून केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा