माळेगाव खुर्द, बारामती:२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन हा दिवस संपुर्ण भारतात साजरा केला जातो.याच निमित्ताने राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्था (NIASM) माळेगांव येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ असुन प्रत्येक नागरिकाला संविधानामुळे प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे असे प्रतिपादन डॉ. के. सम्मी रेड्डी. निदेशक,राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्था (NIASM) माळेगांव यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले तसेच उपस्थित सर्वांना संविधान उद्देशिकेच्या प्रतींचे वाटप करण्यात आले, दरम्यान योगेश भोसले व संदीप आढाव यांच्या वतीने संस्थेसाठी भारतीय संविधान उद्देशिका फ्रेम भेट म्हणून देण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.सामी रेड्डी.निदेशक, राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधक संस्था (NIASM) माळेगांव खुर्द. यांच्यासह श्री.सचिन लोखंडे.सहायक पोलिस निरीक्षक,माळेगांव पोलिस ठाणे.श्री.बालाजी लोंढे. मुख्याधिकारी,नगर पंचायत माळेगांव यांच्यासह सुप्रिया गावडे कर्हावागज पोलीस पाटील.चैत्राली झगडे. मेडद पोलीस पाटील.योगेश खोमणे माळेगाव खुर्द पोलीस पाटील.सरपंच आदित्य काटे,माळेगांव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास साळवे, विश्वास भोसले, चंद्रकांत वाघमोडे, परशुराम आडके, अनिल मदने, संग्राम भोसले, योगेश खोमणे, संस्थेचे अनेक शास्त्रज्ञ, व कर्मचारी उपस्थित होते.

बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश भोसले यांनी मनोगत व्यक्त केले,आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश टेकवाणी यांनी केले तर आभार दयानंद खरात यांनी मानले.
दरम्यान मुंबई येथे २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी, तसेच या घटनेत जे निष्पाप नागरिक यांना उपस्थित सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा