बारामती : सध्याचा ग्राहक संरक्षण कायदा खूप व्यापक सुरुपात आहे. या कायद्यामुळे आता केंद्रीय चौकशी शाखेमार्फत खोट्या जाहिराती करणाऱ्या चित्रपट कलावंतांवरही कारवाई करणे शक्य झाले आहे,अशी माहिती बारामती येथील प्रसिद्ध विधिज्ञ श्री.विशाल बर्गे यांनी दिली.

शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या इस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड इंजिनिअरिंग आणि कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक कायदा आणि तरतुदी या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.सुप्रिया विशाल बर्गे या उपस्थित होत्या. प्राचार्य प्रा. डॉ.राम जाधव, माळेगाव पॉलिटेक्निकचे उप-प्राचार्य,प्रा. डॉ. पुरुषोत्तम जाधव यांच्यासह महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक ही उपस्थित होते.

ॲड.विशाल बर्गे पुढे म्हणाले, नवीन २०१९ चा कायदा दुरुस्त होऊन आलेला ग्राहक संरक्षण कायदा हा खूप व्यापक आहे. ग्राहकाला तो जिथे राहतो तेथील ग्राहक मंचाकडे तक्रार देता येईल. तसेच आता नुकसानभरपाई मिळण्याची मर्यादा वाढून जिल्हा मंचकडून एक कोटी रुपयांपर्यंत, स्टेट फोरम कडून दहा कोटी रुपयांपर्यंत तर नॅशनल कमिशनकडून दहा कोटींच्या पुढे भरपाई मागता येईल.

तसेच दाखल केलेले प्रकरण तीन महिन्यात निकाली काढण्याची जबाबदारी न्यायाधिकरणावर ठेवण्यात आली आहे. तसेच आता कुठूनही ऑनलाईन तक्रार देता येते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. नाझिया सय्यद यांनी केले.
या उपक्रमाबद्दल शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष केशवराव जगताप, विश्वस्त वसंतराव तावरे, अनिल जगताप, महेंद्र तावरे, रामदास आटोळे, गणपत देवकाते, रविंद्र थोरात, सिमा जाधव, चैत्राली गावडे, संस्थेचे सचिव व प्राचार्य प्रा. डॉ. धनंजय ठोंबरे यांनी समाधान व्यक्त केले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा