आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
रुग्ण हक्क परिषदेच्या १२व्या शाखेचे उद्घाटन
गोळीबार मैदानासमोर, सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलच्या शेजारी नवीन शाखा सुरू

0
1
4
5
6
9
पुणे : रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने शहरात प्रत्येक ठिकाणी तसेच उपनगरामध्ये शाखा स्थापन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत आहेत. पुण्यातील पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील, गोळीबार मैदानासमोर, सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलच्या शेजारी रुग्ण हक्क परिषदेच्या १२व्या शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर संघटक सौ. कविताताई डाडर यांच्या नेतृत्वाखाली सदर शाखेची निर्मिती करण्यात आली. यावेळी मंगल राजगे, निशा गायकवाड, शोभा लांडगे, शाखाध्यक्ष मीरा दोडके, ऋषिका लोखंडे यांची शाखा पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. यावेळी कविता डाडर म्हणाल्या की, वस्ती पातळीवर दर महिन्यास आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणार आहे. कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियाना विषयी जनजागृती करण्यासाठी शाखा अग्रेसर राहील, असे त्या म्हणाल्या.