बारामती : शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथे कॉ. दत्ता देशमुख अध्यासन,राज्यशास्त्र अधिविभाग कॉ. दत्ता देशमुख पुरोगामी मंच,स्वाभिमानी वीज कामगार लेनिनवादि लाल निशाण (मासिक) एम.एस.ई.बी. वर्क्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कॉ. दत्ता देशमुखः व्यक्ती, विचार आणि कार्य’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मा. प्रा. श्री.राजू पांडे ( तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय,बारामती, पुणे) हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री.बाबुराव तारळी (स्वाभिमानी वीज कामगार) हे होते.

कॉम्रेड,दत्ता देशमुख यांनी ग्रामीण व शहरी भागातील असंघटित आणि संघटित क्षेत्रातील कामगारांचे संघटन केले. त्यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. शेतकरी, कामगार वर्गामध्ये जाणीव जागृती केली.खऱ्या अर्थाने कॉ. दत्ता देशमुख हे महाराष्ट्राचे लोकशिक्षक होते असे प्रतिपादन प्रा.राजू पांडे यांनी या वेळी केले.

या प्रसंगी कॉ. दत्ता देशमुख अध्यासनाचे प्रमुख आणि राज्यशास्त्र अधिविभागाचे विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. प्रकाश पवार सर, सकाळ वृत्तपत्राचे समुह संपादक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. श्रीराम पवार, मा. श्री. सुरेंद्र कुलकर्णी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.



बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा