
पुणे दि.27: अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या भागाचे पंचनामे तत्काळ सुरु करावेत असे आदेश महसूल, कृषि, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, पशुसंवर्धन इत्यादी विभागांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी दिले आहेत.
उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती इंदापूर तालुक्यात 25 मे रोजी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाची 26 मे रोजी पाहणी करुन तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत.

जिल्हयात सुरु असलेल्या पर्जन्यमानाबाबत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून वेळोवेळी परीस्थितीचा आढावा घ्यावा व घडलेल्या घटनांबाबत तात्काळ प्रतिसाद देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

यासाठी जिल्हास्तरावर आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास सुरु असून त्याचा हेल्पलाईन क्र.020-26123371,26133522 व टोल फ्री क्रमांक 1077 असा असून या नियंत्रण कक्षाशी तालुका व गावपातळीवरील नागरिकांनी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन श्री. डुड्डी यांनी केले आहे.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा