
बारामती : शहर व परिसरात शक्ती अभियानांतर्गत सोशल मीडियावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोस्ट करणाऱ्या इसमांवर शक्ती नजर यानुसार लक्ष ठेवलेले जात असताना तारीख 22/05/2025 रोजी बारामती शहरातील नेहल उर्फ रावण विजय दामोदरे वय 25 वर्ष रा. वडके नगर आमराई बारामती ता. बारामती जिल्हा पुणे याने सोशल मीडिया साइटवर गावठी बनावटीचे पिस्टल घेऊन आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. त्यामुळे सदर इसमावर भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून सदर इसम ताब्यात घेऊन त्यास मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता त्यास तारीख 26/05/2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने शक्ती अभियान हे सामान्य लोकांच्या सुरक्षिततेसाठी पंचतंत्र अभियान राबवण्यात येत असून त्यानुसार गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांवर गोपनीयरित्या तसेच वेगवेगळ्या सोशल मीडिया साइटवर शक्ती नजर याद्वारे प्रशिक्षित पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे कडून विशेष लक्ष ठेवण्यात येत असते.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामिण श्री. संदीप सिंह गिल्ल सो. मा.अपर पोलीस अधीक्षक बारामती, श्री.गणेश बिरादार सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती श्री. सुदर्शन राठोड सो. यांचे मार्गदर्शनाखाली बारामती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास नाळे पोलीस उपनिरीक्षक सतीष राऊत, राहुल भंडारे, पोलीस अंमलदार सागर जामदार, , अमीर शेख, सुलतान डांगे, रामचंद्र शिंदे,अभिजित कांबळे, अक्षय सिताप, जितेंद्र शिंदे, दत्तात्रय मदने, अमोल देवकाते यांनी केलेली आहे.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा