
बारामती : शहर व परिसरात शैक्षणिक दृष्ट्या वेगवेगळी शाळा, कॉलेजेस तसेच खाजगी कोचिंग क्लासेस निर्माण झाले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील बरेचसे विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी येत असतात.
बारामती शहरातील भिगवण रोड या ठिकाणी चालू असलेल्या एका खाजगी कोचिंग क्लास चालकास मोहसीन अकबर पठाण रा. सूर्यनगरी बारामती ता. बारामती. जिल्हा,पुणे. याने खाजगी क्लास चालकाविषयी वेगवेगळ्या सोशल मीडिया साइटवर बदनामीकारक व अश्लील मजकूर पोस्ट करून कोचिंग क्लास चालकास धमकी देऊन त्याचे कडून 50 लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याने मोहसीन अकबर पठाण याच्या विरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर प्रकरणी आरोपी मोहसीन पठाण यास अटक करण्यात आले असून त्यास मा.न्यायालया समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण श्री. संदीप सिंह गिल्ल सो. मा.अपर पोलीस अधीक्षक बारामती, श्री.गणेश बिरादार सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती श्री. सुदर्शन राठोड सो.बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रूपाली पवार तपास करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा