Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामती तालुक्यात अतिवृष्टी, आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा. तहसीलदार गणेश शिंदे

0 1 5 9 0 4

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे बारामती तालुक्यात कालपर्यंत २२६ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

बारामती : दि.२५ तालुक्यातील एकूण ८ मंडळात सरासरी २२६.८७ मिलिमीटर एकूण पर्जन्यमानाची नोंद झाली असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे. 

बारामती मंडळात ३०० मि.मी. माळेगाव बु.१६७-मि.मी., पणदरे २०५ मि.मी., वडगाव निंबाळकर २६१ मि.मी., लोणी भापकर २७९ मि.मी., मोरगाव २३२ मि.मी., सुपा १७८ मि.मी., उंडवडी क.प.१९३ मि.मी. याप्रमाणे सरासरी २२६.८७ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

तालुक्यात २३ मे अखेर सरासरी १४४ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद

बारामती मंडळात १७३ मि.मी. माळेगाव बु.९२-मि.मी., पणदरे ११२ मि.मी., वडगाव निंबाळकर १६५ मि.मी., लोणी भापकर १८४ मि.मी., मोरगाव १६८ मि.मी., सुपा १३० मि.मी., उंडवडी क.प.१२८ मि.मी. याप्रमाणे सरासरी  मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

दिनांक २४ मे रोजी सरासरी ८२.८७ मि.मी पर्जन्यमानाची नोंद

तालुक्यात २४ मे रोजी (शनिवारी) बारामती मंडळात १२७ मि.मी. माळेगाव बु.७५-मि.मी., पणदरे ९३ मि.मी., वडगाव निंबाळकर ९६ मि.मी., लोणी भापकर ९५ मि.मी., मोरगाव ६४ मि.मी., सुपा ४८ मि.मी., उंडवडी क.प.६५ मि.मी. याप्रमाणे सरासरी ८२.८७ मि. मी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

तसेच आज दिनांक 25/05/2025 रोजी पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील ३-४ तासांत जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहावे.

बारामती तालुक्यात अतिवृष्टी होत असून नदी पात्र, कॅनॉल परिसरात नागरिकांनी जाऊ नये, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनास सहकार्य करावे.

आपत्कालीन परिस्थितीच्या काळात प्रशासनाशी संपर्क साधावा. असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.

श्री.गणेश शिंदे
तहसीलदार, बारामती

संपर्क क्रमांक:

99224 47812 / 9359807492

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे