बारामती : इंदापूर तालुक्यातील सराटी गावात २४ मे शनिवारी दुपारी चार वाजता एक धक्कादायक घटना घडली. सुधीर राऊसाहेब महाडिक (वय ४९) हे त्यांच्या मित्राची परवानाधारक बंदूक हाताळत असताना अचानक गोळी सुटली आणि त्यांच्या छातीच्या डाव्या बाजूला लागली,त्यात ते गंभीररित्या जखमी झाले.
गोळी लागल्यानंतर त्यांना तात्काळ अकलूज येथील इनामदार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात हलवण्यात आले सध्या तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया आणि पुढिल उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी 24 मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील सराटी येथील जगदाळे फार्महाउस वर सुधीर महाडिक देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सर्वजण एकत्र आले होते. याच दरम्यान राजकुमार दिलीपराव पाटील यांची परवाना असलेली बंदुक सुधीर महाडिक देशमुख हातळत होते याच दरम्यान या बंदुकीतून गोळी सुटली व ती सुधीर महाडिक यांच्या छातीच्या उजव्या बाजूला लागली त्यात ते गंभीररित्या जखमी झाले.

पोलिसांनी घटनास्थळावरून बंदुकीची रिकामी पितळी पुंगळी, एक हुक्का कप पाईप, एक पत्यांचा सेट मिळून आला आहे.घटनास्थळावरून पोलिसांनी रक्ताचे नमुने घेतलेले आहेत.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल आणि बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी सुधर्शन राठोड यांनी रुग्णालयाला भेट देऊन सुधीर महाडिक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

घटनेची माहिती देताना पुणे जिल्हा पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल म्हणाले, “सुधीर महाडिक हे त्यांच्या मित्राची बंदूक हाताळत असताना ती चुकून सुटली व त्यांना गोळी लागली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे पुढे योग्य ती कारवाई केली जाईल.

सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील रहिवासी आहेत.
दरम्यान रात्री उशिरा इंदापूर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रदिप नानासाहेब जगदाळे रा.सराटी, सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख टेंभुर्णी ता.माढा, विजय शिवाजी पवार रा.बेंबळे तालुका माढा आणि राजकुमार दिलीपराव पाटील रा.अकोले टेंभुर्णी तालुका माढा,अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पुढिल तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत करीत आहेत.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा