Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

जोशी हॉस्पिटल फलटण येथे खुब्याचे कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी.

0 1 5 7 9 4

बारामती : नुकतेच १५ वर्षाच्या पेशंट चे यशस्वी रित्या सांधेरोपण केल्यानंतर पुन्हा एका १९ वर्षाच्या मुलीची जोशी हॉस्पिटल फलटण येथे खुब्याचे कृत्रिम सांधेरोपण यशस्वीपणे करण्यात आले. 

वयाच्या ५ वर्षापासून तिला Perthes disease हा आजार जडला होता. या आजारात खुब्याच्या बॉलचा रक्त पुरवठा कमी पडून तो हळूहळू खराब होऊ लागतो. यापूर्वी तिची २ ऑपरेशन्स दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये झाली होती आणि सांधा वाचवण्यासाठी प्रयत्न ही झाला होता. पण दुर्दैवाने खुब्याचा सांधा हळूहळू पूर्णपणे खराब होऊन गोळा पूर्ण विरघळा होता. वाटी पूर्णपणे बुजून गेली होती.

हे ऑपरेशन अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीचे होते. वाटीचे हाड शोधून त्यामध्ये नवीन वाटी खूप कसोशीनी बसवणे गरजेचे होते.१९ वर्षा च्या पेशंटची कोवळी हाडे खोवताना खूप काळजीपूर्वक ऑपरेशन केले गेले.

सिरॅमिक ऑन पॉली  हा Uncemented सांधा या patient मध्ये बसवण्यात आला.

पायाची उंची ३ cm नी कमी होती ती सुद्धा पूर्ववत दुसऱ्या पाया इतकी करण्यात सर्व टीम ला यश मिळाले. 

अशी गुंतागुंतीची व अवघड आणि जिकिरीची शस्त्रक्रिया मोठ्या शहरांमध्ये मोठ्या हॉस्पिटल्स मध्येच होते ती जोशी हॉस्पिटल,प्रा.लि.येथे पहिल्यांदा यशस्वीरित्या करण्यात आली. 

सदर पेशंट हा पुणे,मुंबई येथे बऱ्याच डॉक्टरांचे ओपिनियन घेऊन आलेला होता.

हा patient आता त्याचे पुढील ऐन तारुण्यातील आयुष्य यशस्वी रित्या जगेल आणि सर्व हालचाली आणि कामे उत्तम रित्या करू शकेल यात काही शंकाच नाही असे डॉ. प्रसाद जोशी यांनी इथे आवर्जून सांगितले.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे