ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
धार्मिक स्थळावरुन हिंसक वळण न लावता सामंजस्याने अतिक्रमण काढले
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथिल मुस्लिम समाजाने समाजासमोर ठेवला आर्दश

0
1
4
5
6
9
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी : अतिक्रमण काढायचे म्हटले की अधिकाऱ्यांची डोके दुःखी ठरत आहे.परंतू कोल्हार खुर्द ता.राहुरी येथिल नगर मनमाड महामार्गालत असलेले मुस्लीम समाजाची शहादुल बाबाची दर्गा अतिक्रमणात येत असल्याने येथिल मुस्लिम समाजाने एकञ येवून दुवा अर्थात विधिवत पुजा करुन स्वताःहुन दर्ग्याचे अतिक्रमण काढण्याचे सर्व समाजा समोर मांडले शहादुल बाबाची दर्गाच्या सर्व समाजाच्या भक्त परिवाराने अतिक्रमण काढण्यास समंती दिल्याने धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढण्यावरुन वाद होतील असा अधिकाऱ्यांचा झालेला गैरसमज दुर झाल्याने अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
अतिक्रमण काढण्यास मुस्लिम समाजाने स्वतःहुन पुढाकार घेतल्याने सर्व समाजाने त्यांचे आभार व्यक्त केले.कोल्हार येथिल मुस्लिम समाजाचा इतरांनी आर्दश घेवून धार्मिक वाद एकञ येवून सामजस्याने मिटतात याचे जिवंत उदाहरण कोल्हार येथे पहावयास मिळाले आहे.राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथिल शहादुल बाबाची दर्गाचे अतिक्रमणा काढताना हिसंक वळण लागेल असे गृहित धरुन मोठा पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता. अतिक्रमण काढण्यासाठी यंत्र सामुग्रीसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे टेक्निकल मॅनेजर अनिल गोरड, टीम लीडर महेश कुमार मिश्रा, आलोक कुमार सिंह, अजिंक्य हजारे, संकेत बिचकुल,राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते.