बारामती :महाराष्ट्रातील नामांकित १७२५ आचार्य अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड पुणे बारामती,यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल तसेच लोकसभागातून शाळेचा विकास करून घेणे अशा व विविध उपक्रमाबद्दल दरवर्षी दिल्या जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार ‘श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द तालुका पुरंदर जिल्हा पुणे’ कार्यालयीन अधीक्षक, श्री.शिवाजीराव काकडे देशमुख यांना बुधवार दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी आचार्य अकॅडमी मुक्ती मुख्यशाखा विद्या प्रतिष्ठान शेजारी बारामती, येथे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या वेळी आचार्य अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर मुटकुळे तसेच श्री.प्रशांत फरांदे सर श्री.निलेश बनकर सर, श्री.देवकर सर, श्री.टेकावडे सर, श्री.प्रवीण ढवळे सर,श्री कापरे सर, तसेच चांडाळ चौकडीचे श्री.रामभाऊ जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या अगोदर सन २०१६-१७ साली जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासह पुरंदर तालुका गुणवंत कर्मचारी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे.



बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा