Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

श्रावण महिना यात्रा उत्सवाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सोमेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचा सत्कार,

0 7 9 2 2 2

बारामती : करंजे (ता. बारामती) श्रावण महिना यात्रा उत्सवाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सोमेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचा सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने करंजे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शाल-श्रीफळ देऊन मानाचा सत्कार केला.

यंदाचा सोमेश्वर देवस्थान यात्रा उत्सव मोठ्या थाटामाटात व शांततेत संपन्न झाला. भाविकांसाठी स्वच्छ शौचालय, पालखी नियोजन, वाहन पार्किंग, सुंदर दर्शन रांग, आकर्षक लाईट रोषणाई, मंदिर व इतर इमारतींना रंगरंगोटी अशा अनेक सोयी-सुविधा करून व्यवस्थापनाने या वर्षी हेवा वाटावा असे काम केले.

सत्काराला उत्तर देताना सोमेश्वर देवस्थान चेअरमन अनंत मोकाशी म्हणाले,हे सर्व कार्य आपल्या सर्वांच्या सहकार्यातून शक्य झाले आहे. देवस्थानच्या इतिहासात प्रथमच ग्रामस्थांनी आमच्या कार्याचा गौरव केला असून, हे आमचं भाग्य आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आम्ही विशेष आभार मानतो.

यावेळी संचालक लक्ष्मणराव गोफणे यांनी सांगितले की,

लवकरच सोमेश्वर कारखान्याकडून अन्नदानासाठी भव्यदिव्य डायनिंग हॉल उभारण्यात येणार असून, संबंधित विभागाला आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेवराव शिंदे म्हणाले,काही वर्षांपूर्वी देवस्थानाच्या व्यवस्थापनाबाबत भाविकांमध्ये नाराजी होती तसेच विविध गैरसोयींबाबत वृत्तपत्रांत चर्चाही होत असे परंतु मागील तीन वर्षांत विश्वस्त मंडळाने पारदर्शक कारभार ठेवून भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि विकासकामात भरीव योगदान दिले त्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

यावेळी विश्वस्त मोहनराव भांडवलकर, सचिव विपुल भांडवलकर, खजिनदार सचिन भांडवलकर, प्रदीप भांडवलकर, विजय कोळपे यांचा देखील उत्कृष्ट लाईट डेकोरेशन व साऊंड सिस्टीम या कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी विक्रम भोसले (मा. चेअरमन, बारामती ता. खरेदी-विक्री संघ), संचालक लक्ष्मणराव गोफणे, बाळासाहेब गायकवाड (माजी कामगार संचालक, सोमेश्वर कारखाना), उद्योजक संतोषराव कोंढाळकर, बाळासाहेब शिंदे (उपसभापती, निरा कृषी उत्पन्न बाजार समिती), सुखदेवराव शिंदे (अध्यक्ष, सोमेश्वर सेवाभावी संस्था), शिवाजीराव शेंडकर (सामाजिक कार्यकर्ते), वैभव गायकवाड (मा. सरपंच, करंजेपूल), दत्तात्रय शेंडकर (मा. सरपंच, सोरटेवाडी), सुरेश मासाळ, संतोष गोडसे, मोहनराव सोरटे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे