गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई: जबरी चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश, ११.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त.पुणे आणि सातारा जिल्ह्यातील तब्बल १० जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस

0
8
4
3
6
8
वडगाव निंबाळकर :
शेतकरी महिलेवर हल्ला करून दागिन्यांची जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ११ लाख ८९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे पुणे आणि सातारा जिल्ह्यातील तब्बल १० जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

कानाडवाडी (ता. बारामती) हद्दीत वाकी रस्त्यावरील शेतात काम करणाऱ्या स्वाती हनुमंत टकले यांच्या गळ्यावर वार करून अज्ञात तीन दुचाकीस्वार चोरट्यांनी ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी व डोरले जबरीने हिसकावून नेले होते. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.




