Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्र

शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई: मॉडिफाइड सायलेन्सर आणि कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर कारवाई

0 8 5 9 5 1

शिक्रापूर : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोरेगाव भीमा, सणसवाडी, तळेगाव शिक्रापूर, कोंढापुरी आणि करंदी परिसरामध्ये बुलेट व इतर दुचाकींवर मॉडिफाइड सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत २२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण २२,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच, कारवाई करण्यात आलेली ही वाहने १५ दिवसांसाठी पोलिसांनी ताब्यात ठेवली आहेत.

​परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडून या कर्णकर्कश आवाजाबाबत आणि फटाक्यांसारखा आवाज काढणाऱ्या दुचाकींबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांनी मागील दोन महिन्यांपासून अशा वाहनांवर विशेष लक्ष ठेवून ही धडक कारवाई केली.

​कर्णकर्कश आवाजामुळे होणारे ध्वनीप्रदूषण आणि वाहतुकीच्या सुरक्षिततेला निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी यापुढेही पोलिसांकडून अशा प्रकारच्या वाहनांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर उपलब्ध कायदेशीर तरतुदींनुसार कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अशा प्रकारे कर्णकर्कश आवाज करणारी किंवा मॉडिफाइड सायलेन्सर असलेली वाहने आढळल्यास नागरिकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या ७०७४१००११२ या मोबाईल क्रमांकावर माहिती द्यावी, त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

“नियमांचे उल्लंघन करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सरच्या वाहनांवर यापुढेही वेळ, ठिकाण किंवा व्यक्तीचा कोणताही मुलाहिजा न ठेवता कायदेशीर कारवाई करण्यात येईल. परिसरातील नागरिकांना शांततामय व सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी ही कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे.”

  • ​चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे