गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
वाईन्स शेजारील ‘ओपन बार’वर बारामती तालुका पोलिसांची धडक कारवाई; चार जणांवर खटले दाखल
एमआयडीसी रोडवरील टपऱ्यांचा बेकायदा बाजार बंद; वैभव वाईन्सलाही लेखी नोटीस

0
6
7
2
5
4
बारामती (दि. 28): बारामती एमआयडीसी रोडवर वैभव वाईन्सच्या शेजारी रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे सुरू असलेल्या ‘ओपन बार’वर बारामती तालुका पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केली असून, यामध्ये चार जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच, वैभव वाईन्सला देखील याप्रकरणी लेखी नोटीस बजावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 7 ते रात्री 9.30 च्या सुमारास पोलिसांनी या परिसरात पेट्रोलिंग करताना ही कारवाई केली. संतोष शहा (गुड्डू पान शॉप) आणि अशोक लोंढे (मालिक टी टपरी) हे दोघे वैभव वाईन्समधून मद्य खरेदी करून बाहेर येणाऱ्या ग्राहकांना रस्त्याच्या कडेलाच ग्लास, पाणी आणि इतर साहित्य पुरवत असल्याचे निदर्शनास आले. उघडपणे मद्यपानास प्रोत्साहन देऊन त्यांनी एक प्रकारचा ‘ओपन बार’च थाटला होता. यामुळे परिसरात मद्यपींचा वावर वाढला होता आणि सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.




