Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

वडगाव निंबाळकर पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस, दोन आरोपी गजाआड

0 9 4 1 4 8

वडगाव निंबाळकर: वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेला मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी फलटण तालुक्यातील दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीची मोटारसायकल आणि गुन्ह्यात वापरलेली अन्य एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० ते रात्री ११.३० च्या सुमारास वडगाव निंबाळकर येथील श्रवण रेस्टॉरंट अँड परमिट रूम बिअर बारसमोरील पार्किंगमध्ये ही चोरीची घटना घडली होती. फिर्यादी अभिजित चंद्रकांत घोडके (रा. वडगाव निंबाळकर) यांनी त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (क्र. MH-42-AC-7749) हँडल लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी या दुचाकीचे हँडल लॉक तोडून ती चोरून नेली होती. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये (गु.र.नं. २०९/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आणि तपासाच्या आधारे अजिंक्य जितेंद्र मोरे (वय २०) आणि अक्षय जनार्दन कांबळे (वय ३१, दोघेही रा. जिंती, ता. फलटण, जि. सातारा) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेली हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल आणि हा गुन्हा करण्यासाठी त्यांनी वापरलेली टीव्हीएस स्टार सिटी मोटारसायकल (क्र. MH-11-AQ-6593) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर धडक कारवाई सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कल्याण खांडेकर, पोलीस शिपाई आबा जाधव आणि पोलीस शिपाई नरेंद्र यादव यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन
वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी आपली वाहने नेहमी सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत. तसेच, केवळ हँडल लॉकवर अवलंबून न राहता वाहनाला अतिरिक्त सुरक्षा साधनांचा वापर करावा, असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे