Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

पेन्सिल चौकात दोन गटांत तुंबळ हाणामारी; बारामती तालुका पोलिसांची तात्काळ कारवाई, १६ जणांवर गुन्हा दाखल

0 9 9 4 1 2

बारामती : बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेन्सिल चौकातील मॉलसमोर दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत १६ जणांवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आपापसात तक्रार देण्यास नकार दिल्याने पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्यादी होऊन ही धडक कारवाई केली.

सविस्तर माहितीनुसार, सावळ (ता. बारामती) गावात सुशांत मोहिते, श्रेया प्रताप आटोळे आणि प्रताप आटोळे यांच्यात वाद झाला होता. या वादाची तक्रार देण्यासाठी सुशांत मोहिते, श्रिया आटोळे आणि तिचा दीर निखिल आटोळे हे दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास बारामती तालुका पोलीस ठाण्याकडे येत होते. याच दरम्यान पेन्सिल चौकातील मॉलसमोर त्यांनी आपापल्या मित्रांना बोलावून घेतले आणि सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

सार्वजनिक ठिकाणी दंगा सुरू असल्याची माहिती मिळताच बारामती तालुका पोलीस ठाण्यातील सपोनि पवार, पोसई अमोल कदम, पोहवा खारतोडे, पोकों मनोज पवार आणि पोकॉ कदम यांनी अवघ्या एका मिनिटात घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि एकमेकांशी वाद घालणाऱ्या सर्व इसमांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
पोलीस ठाण्यात आणल्यानंतर संबंधितांना एकमेकांविरुद्ध तक्रार देण्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी आपसात तक्रार देण्यास नकार दिला. सार्वजनिक ठिकाणी भांडण करून शांततेचा भंग केल्यामुळे आणि नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण केल्याने अखेर पोलीस शिपाई शाहरुख शकील शेख (बक्कल नं. ७२४) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून पोलिसांनी १६ जणांवर गु.रजि.नं. ५३७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९४ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यात गणेश शरद आटोळे, विनोद विठ्ठल आटोळे, अनिकेत प्रमोद बेंगारे, विकास अशोक आटोळे, तुषार बंडु आटोळे, आदेश ज्योतीराम आटोळे, धनाजी संपत आटोळे, स्वप्निल शिवलाल आटोळे, अभिमान अंबुदास लांडगे, समाधान शशिकांत भिसे, सुशांत बाळु मोहिते, प्रितम अंकुश कुचेकर, मनोज सुहास बागाव, निखील शिवलाल आटोळे, सोहम राजु लोंढे, आदित्य अतुल भिसे (सर्व रा. सावळ, ता. बारामती, जि. पुणे) यांना आरोपी करण्यात आले आहे.
सदर गुन्ह्याची नोंद दाखल अंमलदार पोहवा टिळेकर यांनी केली असून, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रदीप काळे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे