Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अवैद्य गुटखा वाहतुकीवर बारामती तालुका पोलीस ठाण्याची कारवाई, २,३०,२५०/-किंमतीचा मुद्देमाल जप्त 

0 6 4 9 7 8

बारामती:  बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत होणाऱ्या अवैद्य धंद्यावर कारवाई करण्याकरीता पुणे ग्रामीण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार 

दिनांक २४/०७/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक वैशाली पाटील बारामती तालुका पोलीस स्टेशन यांना पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना हद्दीत अवैद्य गुटखा वाहतुक होत असल्याची गोपनिय माहीती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या सोबत पोलीस उपनिरीक्षक शिंगाडे व चालक पो.शि तरंगे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी एक ग्रे रंगाची मारूती सुझुकी कंपनीची इको गाडी नंबर एम.एच ४२ बी.बी ७२४० हि शिर्सुफळ ता. बारामती जि.पुणे गावच्या हद्दीत समाज मंदीराच्या शेजारी रोडच्या कडेला उभी असल्याचे दिसले सदर गाडीजवळ जावुन त्यावरील चालकांस त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव पत्ता सागर मनोहर साबळे वय ३२ वर्षे रा. कटफळ ता. बारामती जि.पुणे असे सांगितले, त्याच्या गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये मानवी जिवीतास धोका असणारा व महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेला पानमसाला, गुटखा, तंबाखु मिळुन आल्याने आरोपी याचे ताब्यात असलेली इको गाडी व पानमसाला, गुटखा, तंबाखु असा एकुण २,३०,२५०/-किंमतीचा मुद्देमाल बारामती तालुका पोलीस स्टेशन यांनी जप्त केला.

सदर आरोपी हा पानमसाला, गुटखा, तंबाखु याची अवैद्य विक्री करीत असल्याचे निष्पण झाल्याने सदर आरोपी याचे विरोधात मा. गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण व मा. सुदर्शन राठोड पोलीस उपविभागीय अधिकारी बारामती विभाग पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई विठ्ठल छगन तरंगे यांनी  फिर्याद दाखल केली फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाणे येथेविविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार कांबळे बारामती तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे